Breaking News

कोरोमंडल रेल्वे अपघात : मृतांचा आकडा 300 पर्यंत जाण्याची शक्यता : किंकाळ्या, आरोळ्या आणि मृत्यूचं तांडव!

Advertisements

ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीच्या धडकेत भीषण असा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २३३ इतकी झाली आहे, तर ९०० लोक जखमी झाले आहेत. ANI या विषयीचे वृत्त दिले आहे. सुरुवातीला मृतांची संख्या ३० असल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर ही ५० झाली आता ANI ने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या २३३ इतकी झाली आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो, असे समजते.

Advertisements

रात्रीपासूनच मदत आणि बचावकार्य

Advertisements

अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकांनी अपघात स्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. बहनागा बाजार स्टेशन परिसर हा किंकाळ्या, रडणं, हुंदके, जखमी लोक सगळं रात्रभर त्या परिसरात होतं. एनडीआरएफ ने बोगींच्या मध्ये चिकटेलेले मृतदेह काढण्यासाठी एनडीआरएफला गॅस कटरचा वापर करावा लागला. आत्ताही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. आता लष्करानेही या मदत आणि बचाव कार्यात भाग घेतला आहे. त्यांच्याकडूनही जखमींना मदत केली जाते आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘मेरी मां का मंगलसूत्र देश के लिए कुर्बान? कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी ने किया प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी पर पलटवार

‘मेरी मां का मंगलसूत्र देश के लिए कुर्बान? कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी ने किया प्रधानमंत्री …

हिंदुत्व की आड़ में हो रहा मुसलमानों का उत्पीड़न रोकेगी बसपाः? बसपा सुप्रीमों मायावती

हिंदुत्व की आड़ में हो रहा मुसलमानों का उत्पीड़न रोकेगी बसपाः? बसपा सुप्रीमों मायावती टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *