Breaking News

अमरावतीतील पोलीस अधिकाऱ्याने पत्नी व पुतण्याची पुण्यात केली गोळ्या झाडून हत्या

Advertisements

पुण्यात एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन स्वतःला संपवलं आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

Advertisements

अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पुण्यात राहणाऱ्या पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला आहे. खुनानंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

Advertisements

पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *