Breaking News

सापामुळे दोन दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा बंद

Advertisements

विद्युत पुरवठा करणाऱ्या नदीवरील डीपीतील जनित्रात भला मोठा साप अडकून पडल्याने विद्यूत पुरवठा बंद झाला. तर,तब्बल दोन दिवस बारव्हा ग्रामवासीयांना नळाच्या पाण्यापासूनही वंचित राहावे लागले.

Advertisements

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीतीरावरील मरेमाव घाटावर बारव्हा येथील नळ योजनेचे मोठे जलकुंभ आहे. बाजूलाच विद्यूत जनित्र आहे. दोन दिवसांपासून नळाला पाणी का येत नाहीये म्हणून ग्रा. प. पाणीपुरवठा कर्मचारी प्रदीप झोडे यांनी डीपी वरील डिओची तपासणी करण्याकरिता गेले असता डीपीच्या जनित्रात भलामोठा साप अडकून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची माहिती त्यांनी विद्युत विभाग कर्मचारी यांना दिली.

Advertisements

मागील दोन दिवसापासून परिसरात पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाण्याची टाकी भरली जात नाही. त्यामुळे भर पावसातही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

डोंगरगढ़-खैरागढ रोड की झाडियों के पास मिली मृत तेंदुए की लाश

डोंगरगढ़-खैरागढ रोड की झाडियों के पास मिली मृत तेंदुए की लाश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

अंधाधुंद तरीके से झाड काटे जाने से जंगली जानवरों का ग्रामीणों मे आक्रमण 

अंधाधुंद तरीके से झाड काटे जाने से जंगली जानवरों का ग्रामीणों मे आक्रमण टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *