Breaking News

राज्यात भाजपला लोकसभेत बसणार फटका : किती जागा मिळणार? काँग्रेसला संजीवनी मिळेल काय? वाचा

Advertisements

देशात लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे नऊ ते दहा महिने शिल्लक राहिले आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचा तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न असेल. तर मोदींच्या विरोधात काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी I.N.D.I.A.अशी नवीन आघाडी तयार केली आहे. या आघाडीकडून सत्ताबदल करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Advertisements

पुढील निवडणुकीनंतर कोणाचे सरकार येणार; पंतप्रधान कोण होईल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी एका इंडिया टीव्ही चॅनेलने ओपिनियम पोल घेतला होता. ओपिनियम पोलमध्ये महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे समोर आले आहे.

Advertisements

48 पैकी 20 जागांवर भाजपचा विजय

देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातील 48 पैकी 20 जागांवर भाजपचा विजय होईल, असे ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे. भाजपनंतर सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, त्यांना 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाला फक्त 2 जागा तर शिवसेना ठाकरे गटाला 11 जागा मिळू शकतील. राष्ट्रवादीत अजित पवार गटाला फक्त 2 तर शरद पवार गटाला 4 जागा मिळण्याचा अंदाज या पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

महायुतीला 24, मविआला 24 जागा मिळतील

पोलचा निकाल पाहता राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळत असल्या तरी एकूण सध्या राज्यात असलेल्या महायुतीला फक्त 24 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर महाविकास आघाडीला 24 जागा मिळतील असे दिसते.

सर्वात मोठा धक्का राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसू शकतो असे या पोलमधून दिसत आहे. शिंदे गटाला फक्त 2 जागा मिळतील. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत बंडखोरी करत बाहेर पडलेले आणि उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना देखील फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागू शकते.

विभागानुसार असा असू शकतो निकाल

👉उत्तर महाराष्ट्र

NDA- 3
I.N.D.I.A.- 3

👉विदर्भ

NDA- 5
I.N.D.I.A.- 5

👉मराठवाडा

NDA- 2
I.N.D.I.A.- 6

👉मुंबई

NDA- 4
I.N.D.I.A.- 2

👉ठाणे आणि कोकण

NDA- 5
I.N.D.I.A.- 2

भाजपला 32% तर ठाकरे गटाला 16%

मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपला ३२ टक्के, शिवसेना शिंदे गटाला 7 टक्के, अजित पवार गटाला 5 टक्के, काँग्रेसला 16 टक्के, शिवसेना ठाकरे गटाला 16 टक्के, शरद पवार गटाला 13 टक्के तर अन्यला 11 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

2019 च्या तुलनेत भाजपला 3 जागा कमी

या ओपिनियम पोलनुसार राज्यात 2019 च्या तुलनेत भाजपला 3 जागा कमी मिळतील असे म्हटले आहे. शिंदे गटाच्या 10 जागा कमी होतील. अजित पवार स्वतंत्र निवडणुक लढवणार असल्याने त्यांना 2 जागांचा फायदा होईल. काँग्रेसला 8 जागांचा फायदा होईल. शिवसेना ठाकरे गटाला 5 जागांचा फायदा तर राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे संख्याबळ 2019 च्या इतकेच राहणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

BJP मे शामिल होने को बेताब है पूर्व CM उद्धव ठाकरे? आदित्‍य ठाकरे का दो टुक बयान

BJP मे शामिल होने को बेताब है पूर्व CM उद्धव ठाकरे? आदित्‍य ठाकरे का दो …

नकली शिवसेना का कांग्रेस में विलय होना पक्का? बाल ठाकरे का नाम लेकर भावुक हुए PM मोदी

नकली शिवसेना का कांग्रेस में विलय होना पक्का? बाल ठाकरे का नाम लेकर भावुक हुए …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *