गोपनीय कागदपत्र लीक आणि फोन टॅपिंग प्रकरणातला गुन्हा तर खरा आहे. मात्र आरोपी सापडत नाही म्हणून तपास बंद करण्याची नामुष्की सीबीआयवर आली आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. याचदरम्यान, याच प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला , असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना फोन टॅपिंग प्रकरणावरून मोठा गौफ्यस्फोट केला आहे . मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारवेळी गिरीश महाजन, नवनीत राणा, कंगना रणौत, नारायण राणे यांना खोटे आरोप करून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करण्यात आला’.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या वक्तव्यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, ‘मी सुद्धा ऐकलं की, पवारसाहेब सकाळी एक म्हणाले आणि नंतर दुसरं म्हणाले. पवार साहेब मोठे नेते आहेत. परंतु ते जे बोलतात त्याच्या नेमका उलट अर्थ घायचा असतो. मोदी सरकारच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करत अजितदादांनी आमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे’.