आरोग्य अधिकाऱ्यांने मागितली लाच

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावरील जागेच्या मोबदल्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याची तक्रार आली होती.

चाळीसगाव येथे राहणाऱ्या तक्रारदार युवकांनी या संदर्भात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीत तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. देवराम किसन लांडे यांनी ५० हजारांची लाच मागितल्याचा आरोप केला गेला.

तक्रारदार यांनी त्यांचे घर व जागा भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता भाड्याने देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग येथे अर्ज सादर केला होता. तक्रारदार यांची जागा आरोग्य विभागाकडून भाडेतत्त्वावर घेवून त्यांना नियमित भाडे सुरू करण्याकरीता तक्रारदाराने तत्कालीन आरोग्य अधिकारी देवराम लांडे यांच्या समवेत संपर्क केला. मात्र, लांडे यांनी ५० हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने थेट धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून तक्रार केली. त्यानुसार पथकाने डॉ. लांडे यांच्या विरोधात चाळीसगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

About विश्व भारत

Check Also

राज ठाकरेंची प्रेमिका सोनाली बेंद्रेला जिराफ का म्हटलं जायचं?

एकेकाळी राज ठाकरे यांची प्रेमिका असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेची मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत …

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *