Breaking News

नागपूरजवळील कामठी गोराबाजार येथे दोन गटात हाणामारी

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरालगतच्या छावणी परिषद क्षेत्रातील गोराबाजार परिसरात एकाच परिवाराच्या दोन गटात पोळ्याच्या पाडव्याला हाणामारी झाली. दोन्ही गटाचे दोन जण जखमी झाले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Advertisements

पोलिसांच्या माहितीनुसार, सायंकाळच्या वेळी दीपक मोहनशिंग सीरिया व गोपाल आसाराम सीरिया यांच्यात क्षुल्लक वाद झाला. हा वाद विकोपास जाताच दोन्ही गटाकडून लाकडी दांड्याचा वापर करून एकमेकास मारहाण करण्यात आली. दोन्ही कडील जखमीनी रात्री उशिरा पोलिसात धाव घेतली. दोघाना नागपूर रोडवरील खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता भरती करण्यात आले.शनिवारला वैद्यकीय अहवाल मिळाल्याने गोपाल सीरिया यांच्या तक्रारींवर छावणी परिषदचे माजी उपाध्यक्ष दीपक सीरिया,प्रकाश सीरिया,अश्विन सीरिया यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दीपक सीरिया यांच्या तक्रारीवरून गोपाल आसाराम सीरिया ,रवी सीरिया,कृष्णकांत सीरिया यांच्यावर अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे

Advertisements

दोघेही तक्रारी करणारे हे राजकीय पक्षाचे असून एक भारतीय जनता पक्षाचा तर दुसरा बहुजन रिपब्लिकन एकता मंच चा पदाधिकारी आहे. छावणी परिषदेच्या मागील निवडणुकीत दोन्ही तक्रार करणारे एकमेकाच्या विरोधात वार्ड न.1 मधून निवडणूक लढले होते. यात दीपक सीरिया विजयी झाले होते तर गोपाल सीरिया पराजित झाले होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

लक्ष द्या!रविवारच्या सुट्टीत घराबाहेर पडताय? हवामान विभागाची पावसाबद्दल महत्वाची माहिती

रविवारची सुट्टी आणि गणेशोत्सव सुरु असताना आज सर्वजण घराबाहेर पडतील. दोन दिवसापूर्वीचा नागपुरातील अनुभव लक्षात …

नागपुरात पावसामुळे 4 मृत्यू

नागपूरमध्ये 22 सप्टेंबरच्या रात्री जोरदार पावसामुळे शहर पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. कित्येक गुरे पुरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *