Breaking News

पाकिस्तानच्या सीमेवर मोदी सरकार उभारणार मोठा प्रकल्प : वाचा

भारत-पाकिस्तान सीमेला लागून मोदी सरकार एक मोठा प्रकल्प उभारणार आहे. अदाणी ग्रुपची एक कंपनी त्यांना या कामात मदत करीत आहे. हा एक असा प्रकल्प असेल, ज्याच्या यशाचे संपूर्ण जग कौतुक करेल. आजपासून तीन वर्षांनंतर या भारतीय प्रकल्पाची चमक जगभर पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या स्थापनेनंतर भारताने अक्षय ऊर्जा क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करण्यात भारताला यश आले आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रेन चाइल्ड असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आता भारत जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करीत आहे.

खावडा अक्षय ऊर्जा उद्यान असे नामकरण

गुजरातमधील कच्छचे खारट दलदलीचे वाळवंट भारत आणि पाकिस्तानला वेगळे करते. पण आता हे वाळवंट जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पाचे साक्षीदार होणार आहे. तो प्रकल्प आतापासून येत्या ३ वर्षांत पूर्णपणे तयार होईल. येथे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. ते अंतराळातून दिसू शकतील इतके मोठे असतील. शेजारच्या गावाच्या नावावरून ‘खावडा अक्षय ऊर्जा उद्यान’ असे नाव देण्यात आले आहे.

प्रकल्पाचे काम जोरात सुरू
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर हा प्रकल्प तयार होत असलेल्या ठिकाणी सध्या सुमारे ५०० अभियंते कार्यरत आहेत. जवळपास ४ हजार कामगार खांब बसवत आहेत. या खांबांवर सोलर पॅनल लावण्यात येणार आहेत. एपीच्या एका वृत्तानुसार, तुमची नजर जिथपर्यंत जाणार, तिथपर्यंत तुम्हाला हे खांब दिसतील. काही कामगार विंड टर्बाइनचा पाया तयार करण्यात व्यस्त आहेत. काँक्रीट, रेबार आणि सिमेंट दूरवर पसरलेले दिसतील. हा प्रकल्प ७२६ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. तो आकाराने सिंगापूरच्या बरोबरीचा आहे. याची किंमत अंदाजे २.२६ अब्ज डॉलर आहे. या प्रकल्पासाठी कच्छचे रण निवडले गेले, कारण ते लोकसंख्येपासून दूर आहे. सर्वात जवळील लोकसंख्या असलेले क्षेत्र कच्छच्या रणापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, सीमेपासून जवळ असल्याने येथे तुम्हाला लष्कराचे ट्रक सहज पाहायला मिळतात.

१.८ कोटी भारतीयांची घरे उजळून निघणार
जेव्हा हे अक्षय ऊर्जा पार्क पूर्णपणे तयार होईल, तेव्हा ते दरवर्षी सुमारे ३० गिगावॅट वीज निर्माण करेल. १.८ कोटी भारतीयांची घरे उजळण्यासाठी हे पुरेसे आहे. भारताने आपल्या ‘ग्रीन एनर्जी मिशन’ अंतर्गत देशात ५०० GW नवीकरणीय ऊर्जा क्षमता विकसित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०७० पर्यंत ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ साध्य करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. हा संपूर्ण प्रकल्प ‘अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ द्वारे स्थापित केला जात आहे. गौतम अदाणी यांच्या व्यवसाय समूहाची ही ग्रीन एनर्जी फर्म आहे.

About विश्व भारत

Check Also

‘अदाणी’विरोधात केनियामध्ये शेकडो कामगार रस्त्यावर उतरले

उद्योजक गौतम अदाणी यांचा अदाणी उद्योग समूह हा भारतातील अग्रगण्य उद्योग समूह मानला जातो. त्यामुळेच …

अफगानिस्तान और पाकिस्तान से भारत में ड्रग्स तस्कर सक्रिय

अफगानिस्तान और पाकिस्तान से भारत में ड्रग्स तस्कर सक्रिय टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *