Breaking News

नागपुरात वनविभागाचा विश्रामगृह जळून खाक : एक वनकर्मचारी…

Advertisements

नागपुरातील वनविभागाच्या सेमिनरी हिल्सवरील विश्रामगृहात शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत तळमजल्यावरील व्हीआयपी कक्ष जळून खाक झाले. ही आग विझवण्यासाठी गेलेल्या विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याचा जीव गुदमरल्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले.

Advertisements

सेमिनरी हिल्सवर हरिसिंग सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या रोपवाटिकेजवळ वनविभागाचे विश्रामगृह आहे. नुकत्याच आटोपलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान वनखात्याचे मंत्रालयातील सर्व अधिकारी या विश्रामगृहात मुक्कामी होते. ते परतून आठवडा होत नाही तोच या विश्रामगृहात शॉर्टसर्किट झाल्याने वनविभागाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे क्षेत्र एका महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे आहे. याच परिसरातील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रातही अशी घटना होता होता टळली. यात एका कर्मचाऱ्याला विद्युत प्रवाहाचा झटका लागला. मात्र तो थोडक्यात बचावला. त्यानंतर वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी येथील संपूर्ण विद्युत यंत्रणा बदलण्यास सांगितले होते. या घटनेला दीड महिना झाला, पण अजूनही या महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने यासंदर्भात कोणतेही पाऊल उचललेले नाही.

Advertisements

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी उशिरा जवळच्याच विश्रामगृहात ही घटना घडली. याठिकाणीसुद्धा विद्युत यंत्रणेत बिघाड झाला असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच शॉर्टसर्किट होऊन दहा क्रमांकाचा व्हीआयपी कक्ष जळून खाक झाला. यासंदर्भात प्रादेशिक वनविभागाच्या वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शनिवारी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यात येईल असे सांगितले. रात्र झाल्यामुळे आता कोणताही तपास करणे अशक्य आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी तपासानंतरच शॉर्टसर्कीटमागे नेमके कारण काय, हे कळेल असे त्यांनी सांगितले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूरसह राज्यात शुक्रवारपासून येणार पाऊस!

हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण राज्यात वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार, पाच एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात …

वरिष्ठ समाज सेवी सूर्यभानजी गेडाम अंत: तत्व में विलीन

वरिष्ठ समाज सेवी सूर्यभानजी गेडाम अंत: तत्व में विलीन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट खापरखेडा। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *