Breaking News

स्लॅब अंगावर कोसळून एकाचा मृत्यू

Advertisements

दोन मजली इमारतीवरील स्लॅब तोडताना अचानक संपूर्ण स्लॅब अंगावर कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२०) सकाळी साडेनऊच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगरजवळील सावरी येथे घडली. शुभम रमेश पेलणे (वय ३०, रा. सावरी, जवाहरनगर) असे मृत मजुराचे नाव आहे.

Advertisements

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम याने त्याच्या घरासमोर राहणाऱ्या भिमराव लाडे यांच्या घराच्या वरच्या माळ्यावरील झुला लावलेली सिमेंट विटाची स्लॅब तोडण्याचा ठेका तीन हजार रुपयांमध्ये घेतला होता.

Advertisements

आज सकाळी त्याने स्लॅब तोडण्याचे काम सुरू केले. ड्रिल मशिनच्या मदतीने तीन पक्के कॉलम तोडून झाल्यानंतर चौथा कॉलम तोडत असताना अचानक टॉवरचा स्लॅबचा मोठा थर शुभमच्या अंगावर कोसळला. त्याखाली दबून त्याचा घटनास्थळीच दुर्देवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जवाहरनगरचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, पोलीस पाटील गोविंदा कुरंजेकर, सरपंच गिरीश ठवकर यांच्या समक्ष घटनेचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार

उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नवी मुंबईतील नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक …

शिक्षा सुनावताच कोर्टातच कोसळला क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेन्ट्रेटर मायकल स्लॅटर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जवळपास डझनभर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *