नागपूर : माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील (GPO चौक) घरासमोर आज रविवारी रात्री 12.15 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यात टाटा हयारीअर आणि हुंदाईच्या कारची आमने-सामने टक्कर झाली. अपघात इतका भयंकर होता की, टाटा हयारीअर सारखी दनकट कार उलटली. एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. नागरिकांनी गर्दी केली होती. घटना स्थळावर पोलीस पोहचले. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
