Breaking News

नागपूरपासून 60 किमी अंतरावर स्फ़ोट : एकाचा मृत्यू

भंडारा शहरालगत जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) भीषण स्फोटाची घटना आज सकाळी 08.30 वाजता घडली. या झालेल्या दुर्घटनेत एक कर्मचारी ठार झाला. स्फोट इतका भीषण होता की त्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.नागपूरपासून 60 किमी अंतरावर हा स्फोट झालाय.

सी एक्स विभागात हा स्फोट झाला आहे. मृतकाचे नाव अविनाश मेश्राम आहे. सी एक्स हा केमिकलचा एक विभाग आहे. अविनाश मेश्राम आज सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये कामाला आले होते. ही शिफ्ट पहाटे 6 वाजता सुरू होते. त्यांनी काम सुरू केल्यानंतर अडीच तासात ही घटना घडली. स्फोट होताच ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये खळबळ उडाली.

About विश्व भारत

Check Also

मुरूमासाठी तलाठ्याने घेतले १० हजार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कारवाई करणार का?

नागपूर जिल्ह्यातील कुही तहसील कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी पैशाशिवाय काम करत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. …

पर्यावरण संरक्षण और प्रदूषण नियंत्रण मे अग्रगण्य है कोराडी बिजली केंद्र

पर्यावरण संरक्षण और प्रदूषण नियंत्रण मे अग्रगण्य है कोराडी बिजली केंद्र   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *