Breaking News

कार चार वेळा पलटली आणि आमदार…!

Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (शरद पवार गट) राजू तिमांडे यांच्या गाडीचा शुक्रवारी सायंकाळी जोरदार अपघात झाला. त्यांची पत्नी नंदा, पुत्र सौरव तिमांडे तसेच कारचालक हे अमरावती-वर्धा रस्त्याने येत होते. ते सर्व देवगाव फाट्याजवळ असणाऱ्या एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासासाठी हिंगणघाटकडे निघाले होते. वर्धेजवळील दहेगाव स्टेशनजवळ असताना त्यांची गाडी एकाएकी उसळली. गाडी चार वेळा पलटली. काचा फुटल्या. जवळचे गावकरी गोळा झाले. नक्कीच काही विपरीत झाल्याची चर्चा सुरु झाली. मात्र गाडीतील तिघांच्याही हालचाली दिसून आल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Advertisements

गाडीत अडकलेल्या तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. किरकोळ जखमा दिसून आल्या. मात्र मोठी दुखापत दिसून आली नाही. त्यामुळे देव तारी त्यास कोण मारी, असा सूर उमटला. दुसऱ्या वाहनाने ते परत निघाले. हिंगणघाट येथे पोहोचताच राजू तिमांडे यांनी तिघांनाही दवाखान्यात नेले. आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या. त्यात धोकादायक असे काहीच निष्पन्न झाले नसल्याचे राजू तिमांडे यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

पदभरती रखडली : आचारसंहितेनंतर नियुक्ती मिळणार?

राज्यात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाकडून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु आचारसंहितेमुळे नियुक्ती …

भ्रष्टाचार : जिल्हा परिषदेत एकाच कामाची दोन बिलं मंजूर

जिल्हा परिषदेतील आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालक्यातील काही कामांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *