Breaking News

अमेरिकेत आता फिरायला जाणे कठीण : अमेरिकेत प्रवेश नाही

Advertisements

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा नियम अधिक कठोर केले आहेत. त्यांनी एच १ बी व्हिसा नियम कडक केल्याने त्याचा फटका अनेक भारतीयांना बसला आहे. आता अमेरिकेत जाऊन बाळाला जन्म देऊन, त्याला तेथील नागरिकत्व मिळवून देण्याचा हेतू असल्यास प्रवास व्हिसा नाकारला जाईल, असा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. ‘बर्थ टुरिझम’वरील या कठोर कारवाईचा परिणाम भारतीयांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Advertisements

 

अमेरिकेने परदेशी नागरिकांसाठी आपले प्रवास धोरण अधिक कडक केल्यामुळे, व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या विवाहित किंवा गर्भवती महिलांना आता अधिक कठोर तपासणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या अध्यक्षांनी ‘जन्मतः नागरिकत्व’ समाप्त करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. त्याचाच हा परिणाम आहे. ‘बर्थ टुरिझम’ म्हणजे नक्की काय? अमेरिकेच्या नव्या नियमांमध्ये काय? याचा भारतीयांवर कसा परिणाम होणार? जाणून घेऊयात…

Advertisements

 

अमेरिकेचे संविधान असे सांगते की, पालकांच्या स्थलांतर स्थितीचा विचार न करता, अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेली कोणतीही व्यक्ती अमेरिकेची नागरिक असते. १४ व्या घटनादुरुस्तीनुसार, अमेरिकेत जन्मलेल्या जवळजवळ सर्व मुलांना आपोआप नागरिकत्व मिळते. बर्थ टुरिझम म्हणजे परदेशी नागरिकांनी विशेषतः बाळंतपणासाठी अमेरिकेला प्रवास करणे. याचा अर्थ असा आहे की, त्यांचे स्थलांतरित पालक अमेरिकेत पाय रोवण्यासाठी आणि कालांतराने स्वतः नागरिक होण्यासाठी याचा वापर करतात.

 

गुरुवारी (११ डिसेंबर) भारतातील अमेरिकेच्या दूतावासाने इशारा दिला की, ज्यांचा मुख्य उद्देश अमेरिकेत बाळाला जन्म देऊन मुलासाठी अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणे हा आहे, अशा लोकांना अमेरिका पर्यटक व्हिसा नाकारेल. या वर्षाच्या सुरुवातीला नायजेरियातील यूएस मिशनने अशीच घोषणा केली होती.

 

अमेरिकेत ‘बर्थ टुरिझम’ किती महत्त्वाचा?

किती परदेशी महिला बाळंतपणासाठी अमेरिकेला प्रवास करतात याबद्दल कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. सेंटर फॉर इमिग्रेशन स्टडीजनुसार (सीआयएस) २०१२ मध्ये अंदाजे ३६ हजारहून अधिक परदेशी महिलांनी अमेरिकेत मुलांना जन्म दिला आणि नंतर त्या देशातून निघून गेल्या. बीबीसीने यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या आकडेवारीचा उल्लेख करीत सांगितले की, २०१७ मध्ये जन्मलेली अंदाजे १० हजार मुले परदेशी रहिवाशांची होती. ही संख्या २००७ मध्ये ७,८०० इतकी होती.

 

सेंटर फॉर इमिग्रेशन स्टडीजचा अंदाज आहे की, २०१६ च्या उत्तरार्धात आणि २०१७ च्या पूर्वार्धात तात्पुरत्या पर्यटक व्हिसावर अमेरिकेत प्रवास केलेल्या परदेशी महिलांनी ३३ हजार मुलांना जन्म दिला. मात्र, निस्कनेन सेंटर थिंक टँक या आकडेवारीशी असहमत आहे. अनेक महिला रशिया आणि चीनमधून अमेरिकेत बाळंतपणासाठी प्रवास करतात. एका स्थलांतराशी संबंधित विषयातील वकिलांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले, “अलीकडे मोठ्या संख्येने भारतीय नागरिकदेखील हा मार्ग स्वीकारत आहेत.”

 

फायदा कुणाचा?

ट्रम्पच्या ‘बर्थ टुरिझम’वरील कारवाईचा परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळापासूनच जन्मतः नागरिकत्वावर टीका केली आहे. २०२० मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेटने एक नवीन नियम जारी केला होता. त्यात म्हटले होते की, व्हिजिटर व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या गर्भवती महिलांना अमेरिकेत येण्याचे एक विशिष्ट कारण सिद्ध करावे लागू शकते. आता ट्रम्प प्रशासनाने ‘बर्थ टुरिझम’बाबत कठोर नियम लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे.

 

ज्या अर्जदारांवर मुख्यत्वे बाळंतपणासाठी प्रवास करण्याचा आणि नागरिकत्व मिळविण्याचा संशय आहे, त्यांना बी-१/बी-२ पर्यटक व्हिसा जारी करण्यास अमेरिकेच्या सरकारने बंदी घातली आहे. जन्मतः नागरिकत्व समाप्त करण्याचा आदेश कायदेशीर आव्हानात अडकल्याने तो अजून लागू झालेला नाही. परंतु, यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS)ने जुलैमध्ये एक आराखडा जारी केला. त्यामध्ये हा आदेश कायदेशीर बाबीतून मुक्त झाल्यास कसा लागू केला जाईल, हे स्पष्ट केले आहे.

 

‘बर्थ टुरिझम’वरील या कारवाईमुळे पर्यटक व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या महिलांची तपासणी कठोर होण्याची शक्यता आहे. बर्गन लॉचे वरिष्ठ भागीदार केतन मुखिजा यांनी ‘बिझनेस स्टॅण्डर्ड’ला सांगितले की, गर्भवती असलेल्या महिलांना आता अधिक मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुखिजा म्हणाले, “जर वाणिज्य अधिकाऱ्यांनी निर्धारित केले की, अर्जदाराचा प्राथमिक हेतू मुलासाठी नागरिकत्व मिळवण्याकरिता अमेरिकेत बाळाला जन्म देणे हा आहे, तर ते बी-१/बी-२ व्हिसा नाकारू शकतात. त्यामुळे गर्भवती अर्जदारांना प्रवासाचे स्पष्ट, कायदेशीर कारण स्पष्ट करावे लागणार आहे.”

 

स्थलांतरविषयक वकिलांनी इशारा दिला आहे की, ज्या महिला गर्भवती नाहीत, त्यांनाही अडचणी येऊ शकतात. जोतवानी असोसिएट्सचे वकील आदेश नंदाल यांनी ‘बिझनेस स्टॅण्डर्ड’ला सांगितले, “ज्या महिला गर्भवती आहेत; पण अमेरिकेत बाळंतपण करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही, त्यांच्यासाठी पारदर्शकता महत्त्वाची आहे.”

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात विमानातील १६९ प्रवासी…!मोठी घटना

आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे आपत्कालीन वळविणे आणि झारखंडमधील एअर ॲम्बुलन्सचा भीषण अपघात अशा दोन वेगवेगळ्या घटनांनी मंगळवारी …

सिंधु जल संधि पाकिस्तान में हलचल तेज:बांध निर्माण की समीक्षा शुरु

सिंधु जल संधि पाकिस्तान में हलचल तेज:बांध निर्माण की समीक्षा शुरु टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *