Breaking News

शासकीय अधिकारी, ‘हनीट्रॅप’, १० लाखांची खंडणी अन् नागपुरातील पत्रकार…

Advertisements

गडचिरोलीतील एका सहायक अभियंत्याला ‘कॉलगर्ल’च्या माध्यमातून ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नागपुरातील पोलीस शिपाई आणि एका पत्रकारासह पाच जणांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. आरोपींमध्ये दोन महिलांचा समवेश असून रविकांत कांबळे, सुशील गवई, रोहित अहिर अशी त्यांची नावे आहेत.

Advertisements

४ डिसेंबर रोजी गडचिरोलीत कार्यरत सहायक अभियंता नागपुरातील एका हॉटेलमध्ये आरोपी ‘कॉलगर्ल’सोबत गेला होता. दोघांमधील झालेल्या संवादादरम्यान त्या महिलेला फिर्यादी अभियंता असल्याचे कळले. तिने सदर बाब नागपुरातील एका डिजिटल माध्यमामध्ये कार्यरत पत्रकार रविकांत कांबळे याला सांगितली. रविकांत आणि ‘ती’ची जुनी ओळख होती.

Advertisements

‘त्या’ अभियंत्यांची आणि पोलीस शिपाई सुशील गवईची ओळख असल्याचे रविकांतला माहिती होते. त्यामुळे त्याने ‘कॉलगर्ल’ आणि इतर आरोपींना हाताशी धरून अभियंत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत गवईकडे १० लाखांची मागणी केली. गवईनेही संधी साधून पीडित अभियंत्याला प्रकरण दडपण्यासाठी १० लाख मागितले. मागील महिनाभरापासून आरोपींनी अभियंत्याकडे पैश्यांसाठी तगादा लावला होता. यामुळे त्रस्त अभियंत्याने रविवारी गडचिरोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

त्यावरून गडचिरोली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी नागपूर येथे सापळा रचून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यातील एक महिला फरार आहे. आरोपींना गडचिरोलीत आणल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात आज व उद्या पावसाचा अंदाज

राज्यासह उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि …

नागपूर जिल्ह्यात कामठी, मौदा, पारशिवनी, उमरेड तालुक्यात भूकंप

नागपूरच्या जिल्ह्यातील कामठी, मौदा, उमरेड, पारशिवणी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के अलीकडच्या काही दिवसात जाणवले. हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *