Breaking News

होळीत नागपुरच्या उमरेडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

Advertisements

नागपुरात जिल्ह्यातील दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे.उमरेड तालुक्यात राजुरवाडी पारधी येथे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या हाणामारीत पाच जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Advertisements

 

प्राप्त माहितीनुसार, सोमवार दुपारी पारधी तांड्यावर होळी साजरी केली जात होती. यावेळी येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि धुळवड साजरी करत होते. याचदरम्यान येथे दोन गटामध्ये शाब्दिक वाद झाला.

Advertisements

 

वाद नेमका कशामुळे झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र हा वाद इतका वाढला की, दोन्ही गटात हाणामारी सुरु झाली. दोन्ही गटातील काही जणांनी एकमेकांवर लाठीकाठी आणि दगडांनी हल्ला चढवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे.

 

घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत काही तरुण एकमेंकाना लाठीकाठी आणि दगडांनी मारहाण करताना दिसत आहेत. यात एक महिलाही दिसत आहे. ही महिला तिच्यासोबत असलेल्या तरुणाला वाचवताना दिसत आहे.

 

ही महिला तिच्यासोबतच्या तरुणाचा बचाव करत असताना दुसऱ्या गटातील लोकांनी तिलाही लाठीने मारहाण केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच या घटनेतील काही तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

युवती को बनाया हवस का शिकार? अब छोटी बहन पर बुरी नजर : क्या है मामला?

युवती को बनाया हवस का शिकार? अब छोटी बहन पर बुरी नजर : क्या है …

नागपूर : खापरखेडा बिजलीघर बना शराबियों और अय्याशियों का अड्डा! नॉनवेज पार्टी, नशे में धुत मिले कर्मचारी

नागपूर : खापरखेडा बिजलीघर बना शराबियों और अय्याशियों का अड्डा! नॉनवेज पार्टी, नशे में धुत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *