Breaking News

या फळाची होते अमृताशी तुलना : वर्षातून किती दिवस मिळते?

बाजारात हंगामानुसार विविध फळांची, भाज्यांची रेलचेल पाहायला मिळते. त्यांची विशिष्ट अशी चवही असते आणि फायदेही विशेष असतात. आज आपण अशाच एका खास फळाविषयी जाणून घेणार आहोत, जे बाजारात केवळ 20 दिवस उपलब्ध असतं. ‘बाबूगोशा’ असं अनोखं नाव असणारं हे फळ आकारानेही वेगळं आणि मऊ असतं. मात्र चवीला अतिशय स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी गुणकारी असणाऱ्या या फळाची किंमत जरा जास्त असते. याला काही लोक ‘बब्बू गोशा’देखील म्हणतात. मधुमेहाच्या रुग्णांना हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या फळाविषयी फार कमी लोकांनाच माहिती असते. बाजारात ते दोन प्रकारांत उपलब्ध असतं. एक हिरव्या रंगात आणि एक लाल रंगात.

प्रामुख्याने ही फळं हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये आढळतात. किंमत जास्त असल्याने बाजारात ती फार काळ टिकत नाहीत. राजस्थानच्या करौली भागात त्यांना 70 रुपये किलोचा भाव मिळतो. काहीवेळा हा दर 80 रुपयांवरही जाते.आयुर्वेदिक डॉक्टर उमेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूगोशा फळात भरपूर प्रमाणात फायबर असतं. या फळामुळे शरीरातील पचनव्यवस्था सुरळीत राहते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. तसंच थकवाही दूर होतो. शिवाय मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर ठरतं.

About विश्व भारत

Check Also

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

आजपासून विदर्भात उष्णतेची लाट

  आजपासून २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *