भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची तब्येत खालावल्याची बातमी समोर आली आहे. टाटा सन्सच्या माजी अध्यक्षांनी स्वतः सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, मला माझ्या आरोग्याबाबत अलीकडेच पसरलेल्या अफवांची जाणीव आहे आणि हे दावे निराधार असल्याची सर्वांना खात्री देऊ इच्छितो.
माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे माझी सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे. याबाबत काळजी करण्याचे कारण नाही. मी ठीक आहे आणि मी विनंती करतो की जनता आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहावे.
याआधी रतन टाटा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त होते. त्यांच्या ॲडमिशनची बातमी येताच लोकांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. या अफवेला वेग येण्याआधी, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले की ते बरे आहेत आणि नुकताच हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले आहेत. अशा परिस्थितीत कोणीही काळजी करण्याची गरज नाही. यासोबतच प्रसारमाध्यमांद्वारे चुकीच्या बातम्या पसरवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.