● मावळत्या विधानसभेतील सर्वांत श्रीमंत आमदार भाजपाचे पराग शहा असून त्यांची एकूण मालमत्ता ५०० कोटींपेक्षा अधिक आहे. त्याखालोखाल विद्यामान मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मालमत्ता ४४१ कोटींपेक्षा अधिक असून तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे सांगलीचे आमदार विश्वजित कदम (२१६ कोटी) होते.
● सर्वाधिक ३२ गुन्ह्यांची नोंद अपक्ष आमदार बच्चू कडू (अचलपूर) यांच्यावर दाखल होते. त्याखालोखाल बबनराव पाचपुते (श्रीगोंदा), जितेंद्र आव्हाड (कळवा- मुंब्रा) २५, विकास ठाकरे (नागपूर)२५ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी) आणि गणपत गायकवाड (कल्याण) यांच्यावर प्रत्येकी १८ गुन्हे दाखल होते.
● आमदारांनी निवडणूक लढवितांना प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती जाहीर केली होती. यातील बहुतांश आमदार पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात असून त्यांची मालमत्ता आणि त्यांच्यावरील गुन्हे यात किती बदल झाला आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१९च्या निवडणुकीत उभे राहिलेल्यांपैकी ३० टक्के म्हणजेच ९३२ उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. यातील २० टक्के म्हणजेच ६१८ उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.