श्रीनगर: जम्मू-काश्मिरच्या अवंतीपोरामध्ये शुक्रवारी सकाळी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. कालपासून आतापर्यत तिघांचा खात्मा करण्यात आल्याचे जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले.
सुरक्षा सूत्रानुसार, अवंतीपोराच्या मेज पम्पोरमध्ये गुरुवारी एका चकमकमीत एक दहशतवादी मारला गेला़ तसेच, अन्य दोघे मशिदीत लपले होते. यानंतर आज सकाळी पम्पोरच्या मेज परिसरात एका माहितीनंतर शोध मोहिम (सर्च आॅपरेशन) सुरू करण्यात आली. दरम्यान, मशिदीचा परिसर बराच मोठा असल्याने कारवाई करताना सुरक्षा दलाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. यानंतर दोघांना ठार मारण्यात आले. याशिवाय शोपियांच्या मुनांदमध्येही गुरुवारी एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले होते. या ठिकाणी अद्यापही शोधमोहिम सुरू असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे दक्षिणी काश्मिरच्या अनंतनागमध्ये गुरुवारी सुरक्षादलाने इमरान डार या दहशतवाद्याला अटकही केली असून, त्याच्याकडून हत्यारे आणि स्फोटक हस्तगत करण्यात आले आहेत. तो नुकताच दहशतवादी संघटनेत दाखल झाल्याची माहिती आहे.
Check Also
भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर कोणती कारवाई होणार?
काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग …
पहलगाम हमले के बाद पहली बार सुप्रीम कोर्ट ने उठाया बड़ा कदम
पहलगाम हमले के बाद पहली बार सुप्रीम कोर्ट ने उठाया बड़ा कदम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …