नवी दिल्ली : आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फक्त 36 पैशांचाच फरक राहिला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर एवढं कमी होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे कोरोना संकटातच नागरिकांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. ट्रॅक्टर, ट्रकसह अनेक आवश्यक सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरातही ऐतिहासिक वाढ झाली आहे. आज (23 जून) सलग सतराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. पेट्रोलचे दर 20 पैशांनी वधारले आहेत तर डिझेलमध्ये 55 पैशांनी वाढ झाली आहे. यासोबत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 79.76 रुपयांवर पोहोचलं असून डिझेलचा प्रति लिटर दर 79.40 पैसे आहे. मुंबईतील आजचा (23 जून) पेट्रोलचा दर 86.54 रुपये असून डिझेल 77.76 रुपये आहेत. मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर जवळपास नऊ रुपये आहे.
सतराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल किंमतीत 36 पैशांचाच फरक
Advertisements
Advertisements
Advertisements