Breaking News

जिल्हयात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू

Advertisements

चंद्रपूर  जिल्ह्यात आतापर्यंत 718 बाधित कोरोनातून बरे

Advertisements

रविवारी 35 बाधित दाखल ; 48 बाधितांना सुटी

Advertisements

कोरोना बाधितांची एकूण संख्या 1105

चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने अँटीजन चाचणीचा लाभ घेत असून लक्षणे वाटल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. रविवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या 1105  पर्यंत पोहोचली असून नगीना बाग परिसरातील ५४ वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 718 झाली आहे. तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 376 आहे. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतांशी बाधित हे अन्य आजाराने ग्रस्त होते. आज नगीना बाग येथील 54 वर्षीय पुरुष निमोनियाने आजारी होता. 14 ऑगस्टला त्याना वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात  दाखल  करण्यात आले होते. श्वसनाच्या गंभीर आजारामुळे दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग झाला होता. तपासणीनंतर कोरोना बाधित असल्याचे पुढे आले. वैद्यकीय यंत्रणेच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही 16 ऑगस्टला दुपारी त्यांचे निधन झाले.

जिल्ह्यात आतापर्यंत 9 जण मृत्युमुखी पडले असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आजारातून बरे होण्याची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. आज 48 बाधितांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर विविध ठिकाणच्या चाचण्यांमध्ये 35 बाधित पुढे आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बाधीत हे राजुरा येथील असून राजुरा तालुक्यातून 11 बाधित आज पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सोनुर्ली, टेंभुर्वाही याठिकाणी बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे रुग्ण वाढ झाली आहे.

त्यानंतर चंद्रपूर शहरातील रुग्ण वाढ कायम असून आज 10 बाधित पुढे आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अॅन्टीजेन चाचणी सुरु आहे. तुकूम, ऊर्जानगर, रयतवारी कोलरी, पोलिस कॉटर परिसरातील हे रुग्ण आहेत. या भागातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुल शहरातील 6 बाधित पुढे आले आहेत. बाधिताच्या संपर्कातून हे रुग्ण पुढे आले आहेत.

याशिवाय सावली(1) ब्रह्मपुरी(1) चिमूर(2) कोरपणा(1) भद्रावती(2) घुगुस(1) या ठिकाणी बाधित आढळून आले आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला …

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *