माणसा-माणसांच्या मनात आनंद फुलवणारे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या शब्दाला जागत, पोंभुर्णा येथे अगरबत्ती उद्योग सुरू करून अनेक संसारात आनंदाचा सुगंध दरवळत ठेवला. हा दरवळ आता थेट राज्याच्या राज धानीत, श्री सिध्दीविनायका च्या दरबारी पोहोचतो आहे… योगायोग म्हणजे, या दिवशी श्री गणेश चतुर्थी आहे! राज्याचे माजी अर्थ व वनमंत्री आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे अगरबत्तीचे उत्पादन केले जात आहे. येथे तयार होणारी अगरबत्ती आयटीसी या नामवंत कंपनीने घ्यावी यासाठी आ. मुनगंटीवार यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या कंपनीने मुनगंटीवारांच्या शब्दाला मान देत, ही जबाबदारी स्वीकारली असून, आता पोंभुर्णा येथील हा भक्तीचा दरवळ थेट मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरापर्यंत पोहचत आहे. श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून ‘मंगलदीप टेंपल-लॉर्ड गणेशाज् फेव्हरेट फ्रॅग्रन्स अगरबत्तीङ्क या नावाने ही अगरबत्ती बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात येणार असून, सुप्रसिध्द माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि अभिनेते सोनू सूद आदी मान्यवर माध्यम ठरत आहेत. मुनगंटीवार अर्थमंत्री असताना त्यांनी त्यांचे पाचही अर्थसंकल्प श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेवूनच विधानसभेत सादर केले आहेत. सिध्दीविनायकावरची त्यांची अमिट श्रध्दा या अगरबत्तीच्या माध्यमातून अर्पण होत आहे. पोंभुर्णा येथील अगरबत्ती देशासह जगभर जावी, हे मुनगंटीवारांचे स्वप्न होते. स्वप्नपूर्तीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
मुनगंटीवार यांनी वनमंत्री पदाच्या कार्यकाळात चांदा ते बांदा या योजनेंतर्गत हा प्रकल्प मंजूर केला. चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कार्यान्वित या प्रकल्पाच्या इमारतीत एकूण ७५ स्वयंचलित यंत्राद्वारे अगरबत्ती उत्पादित होत आहे. तसेच आधुनिक संयंत्राद्वारेच एकत्रिकरण आणि पुडे बांधण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. दरमहा ७५ मेटिड्ढक टन अगरबत्तीचे उत्पादन घेण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून सुमारे २०० स्त्री-पुरुषांना रोजगार मिळत आहे. पोंभुर्णा येथे उत्पादित अगरबत्तीच्या माध्यमातून श्रध्दा आणि भक्तीचा खरा सुगंध दरवळेल, असे आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मोठ्या तळमळीने काम करणाèया एका लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून उत्पादित या अगरबत्तीचा ‘चांदा ते बांदाङ्क असा हा प्रवास लक्षवेधी ठरतोय !