Breaking News

दुचाकी अपघातात एस.टी वाहनचालकाचा मृत्यू

Advertisements

गोंडपिपरी तालुक्यातील घटना

गोंडपिपरी-:चेतन मांदाडे – गोंडपीपरी ते खेडी कामाला मंजुरी मिळाली असून दिड वर्षांपासून रोड च्या एका बाजूला ३ फूट नाली चुकीच्या पद्धतीने कंत्राटदाराने खोदली आहे.दिड वर्षांपासून काम बंद अवस्थेत आहे.रस्त्यावर दिशादर्शक यंत्र नाही.त्यामुळे दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या खाली दुचाकी उतरली व अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभिर जखमी झाला.ही घटना तालुक्यातील वढोली खराळपेठ च्या मधोमध बुधवारी दि(२६) सायनकाडी ८ च्या सुमारास घडली.पवन नारायण चापले करंजी वय (३८) असे मृतक तर शिकृष्ण गेडाम वय (४०) बलरशाहा बामणी असे जखमीचे नाव आहे.
पवन व श्रीकृष्ण दोघेही परिवहन विभागात वाहनचालक असून कार्यालयीन कामाकरिता गडचिरोली आगार व्यवस्थापक यांच्याकडे गेले होते.वाहनचालक असून सुद्धा यांना e-paas शिवाय जिल्हा ओलांडायची परवानगी नाही आष्टी पोलिसांनी e-paas शिवाय जाण्याकरिता परवानगी न दिल्याने आड मार्गाने शासकीय कामानिमित्य गडचिरोली गाठून काम पूर्ण करून येताना त्यांचा मूल खेडी मार्ग एका बाजूने खोदून असल्यामुळे दुचाकीचा अपघात झाला.कंत्राटदाराच्या चुकीमुळे वाहनचालक असलेल्या पवन ला मात्र जीव गमवावा लागला.अपघातानंतर लगेच उपस्तितांनी रुग्णवाहिकेला फोन केला मात्र गोंडपीपरी रुग्णालयाला १०८ एकच रुग्णवाहिका असल्याने ती पोहचू शकली नाही अपघातानंतर तबल एक तास उशिरा वढोलीतील सामाजिक कार्यकर्ते सुरज माडुरवार,सुरेंद्र मडपल्लीवार,गिरीधर चुदरी,दिनेश भोयर यांनी गोंडपीपरी पोलिसांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.परंतु डॉकटरांनी पवन ला मृत घोषित केले.व जखमी गेडाम याला चंद्रपूर उपचाराकरिता रेफर करण्यात आले.गोंडपीपरी खेडी मार्गाच्या कंत्राटदारवार मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *