Breaking News

मृत कोरोना योध्याच्या वारसास शासकीय सेवेत घ्या

Advertisements

– आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
– मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना पाठविले पत्र

Advertisements

चंद्रपूर,
कोवीड १९ मध्ये सेवा करीत असताना मृत झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाèयांच्या वारसांना ३० दिवसांच्या आत अनुकंपा तत्वावर विशेष बाब या सदराखाली शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात अस्तित्वात असलेल्या शासन निर्णयात त्वरित सुधारणा करावी, असेही आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री व मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
या मागणी संदर्भात आपली भूमिका विशद करताना आ. मुनगंटीवार यांनी म्हटले की, गेले सहा महिने संपूर्ण देश कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे उदभवलेल्या महामारीचा सामना करीत आहे. कोविड १९ चा सामना करताना शासन सेवेतील डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचारी असे विविध घटकसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडून मृत्युमुखी पडले आहेत. आपल्या जीवावर उदार होवून हे अधिकारी व कर्मचारी कोरोनाचा सामना करीत आहेत. त्यात त्यांचा जीवही गेला आहे. आता ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोविड १९ मध्ये सेवा करीत, असताना मृत झालेल्या अधिकारी व कर्मचाèयांच्या वारसांना ३० दिवसाच्या आत शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शासकीय सेवेत असताना मृत झालेल्या कर्मचाèयांच्या अवलंबितांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याबाबत शासन निर्णय अस्तित्वात आहे. यात त्वरित सुधारणा करून कोविड १९ मध्ये सेवा करणाèया अधिकारी व कर्मचाèयांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अवलंबिताना ३० दिवसाच्या आत प्राधान्याने, अग्रक्रमाने नोकरी देण्यात यावी, अशा आशयाची सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. या पद्धतीची सुधारणा शासन निर्णयात केल्यास कोरोनाच्या विरोधात लढा देताना अधिकारी व कर्मचाèयांना आपल्या कुटूंबाच्या सुरक्षिततेबाबत शाश्?वती मिळेल, असेही आ. मुनगंटीवार यांनी शासनाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *