वर्धा, दि 31: जिल्हा प्रतिनिधी:- संकटग्रस्त महिलांना तातडिने एकाच ठिकाणी मदत मिळण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने “सखी वन स्टॉप सेंटर” ही योजना सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार सामान्य रुग्णालय परिसरातील धर्मशाळेच्या इमारतीमध्ये “सखी वन स्टॉप सेंटर” सुरु करण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसाचार, पिडीत, लैगिक शोषणाच्या पिडीत , मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या महिला, ॲसिड हल्ल्यातील पिडीत महिला, बालकास समुपदेशन सेवा कायदेशिर मदत, आवश्यक वैद्यकिय मदत व तात्पुरत्या स्वरुपात निवासाची व्यवस्था तसेच इतर आवश्यक मदत “सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून मिळणार आहे. महिलांना तक्रारी करावयाच्या असल्यास oscwardha1@gmail.com या मेल वर तक्रार करु शकरणार आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.
