चंद्रपूर/ ब्रह्मपुरी/ सावली
जिल्ह्यात संततधार पावसाने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेक शिवारात पाणी जमा झाले आहे सावली तालुक्यातील हरंबा, लोंढोली, पेठगाव या शेत शिवारात पुराचे पाणी शिरले. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, पिंपळगाव, रानमोचन, परडगाव, किन्ही येथील अनेक घरे पाण्याखाली आली आहेत. दरम्यान, लाडज येथील अडकले ल्या पूरग्रस्तांना काढण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे.
तीन दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या बाजूने वैनगंगा नदी वाहते. सततच्या पावसामुळे व वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने नदीला पूर आलेला आहे त्यामुळे सावली तालुक्यातील नदी काठावर वसलेल्या हरंबा, उपरी, कापसी पेडगाव शेत शिवारात पुराचे पाणी शिरले आहे.पुराचा फटका नदीकाठावर असलेल्या हरांबा, उपरी, कापसी पेटगाव, लोंन्ढोली, शिवारातील पिकांना बसला आहे. सोबतच सावली- हरंबा या मार्गावरून वाहणाèया नाल्याला पूर आल्याने तो मार्ग बंद झालेला आहे . पेठगाव या गावाच्या सुद्धा इतर गावांशी संपर्क तुटला असून गावाबाहेर जाणाèया मार्गावर पुराचे पाणी वाहत आहे. सतत वाढत असलेल्या पाण्याच्या पातळीमुळे पुरासारखी स्थिती निर्माण होते की काय अशी भीती नदीकाठाजवळ असलेल्या गावकèयांमध्ये निर्माण झाली आहे. पुराचे पाणी शिवारात शिरल्याने खरीप हंगामातील धान व इतर पिके भाजीपाला याचे अतोनात नुकसान झाले आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले )रानमोचन, परडगाव व अनेक गावात पाणी शिरले आहे तर आवळगाव येथेही पुलावर पाणी चढल्याने गांगलवाडी ते मुडझा मार्ग बंद झालेला तर भाजीपाला, धान शेतीचेही प्रचंड नुकसान झालेले आहे. पुराच्या पाण्याखाली पिंपळगाव व रानमोचन येथील अनेक घरे पाण्याखाली आली आहेत. गोसीखुर्द धरणाचे पाणी विसर्ग होण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पाणी वेगाने वाढत असून नदी दुथडी भरून वाहत आहे नदी लागत असलेल्या नाल्या मुळे पाणी गावात शिरत आहे तर काही ठिकाणी छोटे मोठे नाले भरल्यामुळे शेतातही नदीचे पुराचे पाणी घुसले असल्याने धान पिक बुडाली असल्याने धान पिकांचे नुकसान मोठ?ा प्रमाणात झाले आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) गावात वैनगंगा नदीचे पुराचे पाणी शिरले आहे तर देऊळगाव ते कोल्हारी नाल्यावर पूर आल्याने मार्ग बंद झाला असून धान शेती पाण्याखाली आली आहे तसेच तालुक्यातील मुडझा मार्गावरील आवडगाव पुलावर पाणी चढल्याने गांगलवाडी मुडझा मार्ग बंद झालेला आहे वैनगंगा नदीला पाणी झपाट्याने वाढत असल्याने नाल्याना दाब येत असल्याने वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी नाल्यांद्वारे नदीकाठा लगत असलेल्या गावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
