Breaking News

कृषी विभागाने जिल्हयातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या शेतीची मौका पाहणी करुन शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करावी, खासदार रामदास तडस

 

खासदारांकडून यांनी नेरी व मीरापूर ता. जि. वर्धा सोयाबीन उत्पादक नुकसानग्रस्त शेतांची पाहणी

वर्धा प्रतिनिधी :सचिन पोफळी :-  वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर उंड अळी, खोड अळी व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.  त्यामुळे शेतक-यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन खासदार रामदास तडस यांनी नेरी व मीरापूर ता. जि. वर्धा येथील शेतक-याच्या शेतात जावून प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली. यावेळी भाजपा महामंत्री मिलींद भेंडे, प.स.सभापती महेश आगे, प्रमोद वरभे, नेरी मीरापुर सरपंच प्रतिभाताई  गावंडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल भडके, यशवंतराव गावंडे, दिलीपभाऊ भोमले, सचिन थोटे, महेश महल्ले, अंकुश भाऊ तलांडे, प्रकाश हट्टीटेल, कैलासभाऊ थोटे, शुभम घोडे, संतोष मीरापुरकर, प्रकाशभाऊ पुंडेकर, रवी ठाकरे, शाहरुख पठाण, चंदू जंजाळ उपस्थीत होते.

विदर्भात सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. मात्र, आधी बोगस बियाणांमुळे परेशान असलेल्या शेतक-यांना आता सोयाबीन पिकांवर खोड अळी व अज्ञात रोग आल्याने मोठं संकट उभं राहिलं आहे. सोयाबीनवर अज्ञात रोग आल्याने शेतकर-यांच्या हातची पिकं गेली असून त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे.  सोयाबीन घेऊन शेतकर्यांनी शेतात पेरले, पण बोगस बियाणांमुळे पीक आलं नाही. आता पीक आलं तर अज्ञात रोगाने ते मारून टाकलं आहे. त्यामुळे सोयाबील उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतकरी सोयाबीनच्या पिकावर रोटावेटर फीरवत आहे, तसेच सोयीबीन पिक जनावरांना टाकत आहे, या सकंटात सापडलेल्या शेतक-यांना शासनाकडून मदत मिळणे आवश्यक आहे, परंतु  शेतक-यांना महाआघाडी सरकारने वा-यावर सोडले आहे, महाआघाडी सरकार शेतक-यांना बांदावर 25 हजार रुपयाची मदत देणार होते, परंतु नुकसानग्रस्त शेतक-यांना एकही रुपयाची मदत केली नाही, कृषी विभागाने जिल्हयातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या शेतीची मौका पाहणी करुन शेतक-यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी यावेळी केली.

 

About Vishwbharat

Check Also

वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार : परिसरात दहशत

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्या. मेंढा (माल) …

मेलघाट धारणी सडक निर्माण कार्यों में अनियमितताएं और भ्रष्टाचार

मेलघाट धारणी सडक निर्माण कार्यों में अनियमितताएं और भ्रष्टाचार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *