Breaking News

3 सप्टेंबर पासून चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येणारे लॉक डाऊन सध्या स्थगित

चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-29 ऑगस्ट ला मा.पालकमंत्री विजय वडडेट्टीवार यांनी 3 सप्टेंबर पासून एक आठवडा चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यानंतर केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार कोणतेही राज्य, जिल्हा यांना केंद्र शासनाची परवानगीशिवाय लॉक डाऊन करता येणार नाही.

त्यामुळे लॉक डाऊनच्या परवानगी साठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र त्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे उद्या 3 सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणारे लॉकडाऊन सध्या स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *