चंद्रपूर जिल्ह्यात (दि.8सप्टेंबर) रोजी 24 तासात 331कोरोना बाधित – तीन कोरोना बाधितांचा मृत्यू

🔺बाधितांची एकूण संख्या 4386

चंद्रपूर(दि.8सप्टेंबर):- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 331 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 हजार 386 झाली आहे. यापैकी 2 हजार 232 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 103 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये 3 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये नेरी तालुका चिमूर येथील 55 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 7 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यु हा गांधी चौक, गोंडपिपरी येथील 41 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 4 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 7 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तर, तिसरा मृत्यु माजरी, भद्रावती येथील 75 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 7 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 7 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 51 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 47, तेलंगाणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 189, बल्लारपूर तालुक्यातील 50, ब्रह्मपुरी तालुक्यातील 27, वरोरा तालुक्यातील 14, सिंदेवाही तालुक्यातील 11, राजुरा तालुक्यातील 10, भद्रावती तालुक्यातील 7, मूल तालुक्यातील 4, सावली तालुक्यातील 4, कोरपना तालुक्यातील 3, गोंडपिपरी तालुक्यातील 3, जिवती तालुक्यातील 2, चिमूर तालुक्यातील एक व नागभीड तालुक्यातील एक तर वणी- यवतमाळ जिल्ह्यातील 3, गडचिरोली जिल्ह्यातील 2 असे एकूण 331 बाधित पुढे आले आहे.

चंद्रपूर शहर व परीसरातील नगीना बाग हिस्लॉप कॉलेज परिसर, पठाणपुरा वॉर्ड, जगन्नाथ बाबा नगर, सम्राट चौक घुटकाळा वार्ड, इंदिरानगर गायत्री चौक, बंगाली कॅम्प, महाकुर्ला, जल नगर वार्ड, अंचलेश्वर वार्ड, समाधी वार्ड, हनुमान नगर, बालाजी वार्ड, सिंधी कॉलनी परिसर, चोर खिडकी परिसर, भानापेठ वार्ड, रयतवारी कॉलनी परिसर, पंचवटी लॉन परिसर, गोकुळ गल्ली परिसर, कोसारा, जटपुरा वार्ड, रामनगर, साईनगर तुकुम, भिवापूर वार्ड, बाबुपेठ, सरकार नगर, नेहरूनगर, बापट नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

बल्लारपूर तालुक्यातील कळमना, बालाजी वार्ड, रवींद्र नगर, गोरक्षण वार्ड, पंडित दीनदयाल वार्ड, फुलसिंग नाईक वार्ड, गांधी वार्ड, विवेकानंद वार्ड, टिळक वार्ड, सरदार पटेल वार्ड, संतोषीमाता वार्ड, नवी दहेली, श्रीराम वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील फॉरेस्ट कॉलनी परिसर, लाडज, संत रविदास चौक, विद्यानगर भागातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील गाडगे नगर, सरदार पटेल वार्ड, बोर्डा, एकार्जूना, पावना, कुचना परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *