चंद्रपूर जिल्ह्यात (दि.11सप्टेंबर) 24 तासात 401 कोरोना बाधित – पाच कोरोना बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर(दि.11सप्टेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 401 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 हजार 253 झाली आहे. यापैकी 2 हजार 827 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 2 हजार 365 कोरोना बाधितावर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये 5 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये बालाजी वॉर्ड चंद्रपुर येथील 48 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 4 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच न्युमोनियाचा आजार असल्याने 11 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यु सिस्टर कॉलनी चंद्रपूर येथील 42 वर्षीय महिला बाधितेचा आहे. 9 सप्टेंबरला बाधितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 11 सप्टेंबरला पहाटे बाधितेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तिसरा मृत्यु माजरी, भद्रावती येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 8 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

चवथा मृत्यु बल्लारपूर येथील 56 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 7 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तर, पाचवा मृत्यु ब्रह्मपुरी येथील 78 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 9 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 61 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 57, तेलंगाणा एक, बुलडाणा एक व गडचिरोली दोन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 220, कोरपना तालुक्यातील 12, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, चिमूर तालुक्यातील 19, नागभीड तालुक्यातील एक, पोंभूर्णा तालुक्यातील 4, बल्लारपूर तालुक्यातील 23, ब्रह्मपुरी तालुक्यातील 32, भद्रावती तालुक्यातील 16, मूल तालुक्यातील 27, राजुरा तालुक्यातील 20, वरोरा तालुक्यातील 10, सावली तालुक्यातील 2, शिंदेवाही तालुक्यातील 8, गडचिरोली येथून आलेले दोन तर उमरेड-नागपुर येथून आलेले दोन असे एकूण 401 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले चंद्रपूर शहर व परिसरात बाधित:-

चंद्रपूर शहरातील गोपालपुरी बालाजी वार्ड, सरकार नगर, कृष्णानगर केरला कॉलनी परिसर, हनुमान चौक, विठ्ठल मंदिर वार्ड, भिवापुर वॉर्ड, जटपुरा गेट परिसर, सरकार नगर, बाबुपेठ वार्ड, इंदिरा नगर, जल नगर वार्ड, सराई वार्ड, पंचशील चौक, घुगुस, शेनगाव, गोरक्षण वार्ड, वडगाव, बापट नगर, चव्हाण कॉलनी परिसर, रयतवारी कॅालरी परिसर, दत्तनगर, वाघोबा चौक तुकूम, आंबेडकर चौक परिसर, बिंनबा गेट परिसर भागातून बाधित पुढे आले आहे.

तालुक्‍यातील या ठिकाणी आढळले बाधीत:-

ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर, शांतीनगर, बरडकिन्ही, कन्हाळगाव, सौंदरी, संत रविदास चौक परिसर, देलनवाडी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.बल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्ड, बालाजी वार्ड, झाकीर हुसेन वार्ड, फुलसिंग नाईक वार्ड, गणपती वार्ड, बामणी, बुद्ध नगर वार्ड, विद्यानगर वार्ड, टिळक वार्ड, परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. मूल तालुक्यातील चितेगाव, बोरचांदली, भागातून बाधित ठरले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *