सम्पूर्ण चन्द्रपुर जिल्हात 7 दिवासा साठी जनता कर्फ्यू
चंद्रपूर: जिल्हा व शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 8 हजाराच्या जवळपास आलाय. शिवाय मृतांच्याही आकड्याने शंभरी पार केली आहे.
अश्या स्तिथीत रुग्णांचे होत्साते हाल, खाजगी व शासकिय रुग्णालयांची अवस्था, कोरोना योध्देच कोरोनाग्रस्त होण्याचे वाढते प्रमाण, नागरिकांची बाजारात वाढणारी गर्दी, संसर्गातून कोरोनाची वाढलेली संख्या व इतर सर्व बाबींचा विचार केल्यास आता खरे लॉकडाऊन हवे अश्या प्रतिक्रियाही नागरिक व्यक्त करीत आहेत.
आज 21 सप्टेंबर ला नियोजन इमारतीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनातील लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, जिल्हा अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुन्हा एकदा जिल्ह्यात वाढत्या कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी शुक्रवारी 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत वरील बैठकीत संपूर्ण जिल्ह्यात एक आठवडा सार्वजनिक कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.