Breaking News

हाथरस येथील पीडितेला न्यायमिळण्याकरिता राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करावा : आमदार प्रतिभाताई धानोरकर

Advertisements
  • हाथरस येथील पीडितेला न्यायमिळण्याकरिता राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करावा : आमदार प्रतिभाताई धानोरकर 
  • चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन
चंद्रपूर : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील दलित तरुणीवरील अत्याचाराचे वास्तव दडवू पाहणाऱ्या उत्तरप्रदेशातील योगी सरकारला विरोधी पक्ष, माध्यमे आणि जनतेच्या दबावासमोर झुकावे लागते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या गावामध्ये जात तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
 यूपी पोलिसांच्या चौकशीवर कुणीच समाधानी नाही, त्यामुळे हाथरस प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली दिला जावा. देशाचे राष्ट्रपती हे देखील एक दलितच आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली. आज गांधी चौक येथे चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे  हाथरस येथील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याकरिता सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.   
                  यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रितेश(रामू) तिवारी, ग्रामीण काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रकाश देवतळे,  जिल्हा परिषद सदस्य ममता घनश्याम डुकरे, अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव मलक शाकीर, महाराष्ट अनुसूचित जाती उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल,  अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अनुताई दहेगावकर, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, एन. एस. यु. आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, नगरसेविका संगीता भोयर, ललिता रेवल्लीवार, नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक प्रवीण पाडवेकर, मंगेश डांगे, युवक कांग्रेस प्रदेश सचिव सचिन कत्याल, अनुसूचित जाती शहराध्यक्ष कुणाल रामटेके, युवा कांग्रेस प्रदेश सचिव रूचित दवे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रेय, युवक कांग्रेस शहर उपाध्यक्ष नौशाद शेख, माजी नगरसेवक राजू रेवलिवार, माजी नगरसेवक प्रसन्ना सिरवार, माजी नगरसेवक पिंकी दीक्षित, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, माजी नगरसेवक पितांबर कशब, माजी नगरसेविका एकता गुरुले, गौज खान,  पप्पू सिद्दीकी, श्रीनिवास बंडेवार, शाबिर सिद्दीकी,  केतन दुरसेल्वार, रुपेश  वासेकर, सुल्तान भाई, भानेश जंगम, सलीम शेख, राजू त्रिवेदी  वैभव येरगुडे, काशिफ अली, राजेश वर्मा, मोहन डोंगरे, नरसिंग रेवलिवार, वाणी दारला, विद्या दारला, बसंती रायपुरे, अनिश राजा, अनुश्री हीरादेवे, वंदना भागवत, सुनंदा नागभिडकर, रवी रेड्डी, मनोज चंबूलकर, अनीता दातार, विजय धोबे यांची उपस्थिती होती. 
                चंद्रपूर शहर काँगेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी संबोधीत करताना म्हणाले कि, उत्तर प्रदेशातील हाथरस येथिल दलित युवतीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.  ही घटना अतिशय दुर्दैवी चीड आणणारी आहे.  या घटनेकडे योगी सरकार व समाजातील तथाकथित लोक मुग गिळून गप्प आहे.  या घटनेच्या तीव्र निषेध करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *