स्वच्छता पुरस्कारावर उपस्थित होत आहे प्रश्न चिन्ह
वरोरा –
नगर परिषदेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला ही वरोराकरांनसाठी अभिमानाची बाब असली तरी मात्र वस्तुस्थिती ही या उलट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याची सुरुवात नगरपरिषदे पासूनच म्हणन्या पेक्षा नगर परिषद मधून करूया असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपणास आच्यर्य वाटेल पण शत प्रतिशत सत्य आहे ज्या नगर परिषदेला स्वच्छता पुरस्कार मिळाला त्याच नगर परिषदेचे प्रसाधन गृह घाण व दुर्घन्धी मुळे वापरण्याच्या परिस्थितीत दिसत नाही इथले कर्मचारी कधी का होईना पण या प्रसाधन गृहाचा कसा उपयोग करत असेल त्यांनाच माहीत जो व्यक्ती या प्रसाधन गृहाचा उपयोग करत असेल त्याच्या हिमतीची दाद द्यायला हवी जेव्हा ही परिस्थिती कॅमेऱ्यात रेकार्ड करण्या करीता गेलेला प्रतिनिधी लागल्याचं पावलाने त्या प्रसाधन गृहातून वापस आला परंतु या नगर परिषदेची खरी परिस्थिती जनतेसमोर आनण्यास प्रतिनिधींनी हिम्मत करून त्या घाण दुर्घन्धीत तीन चार मिनिटे रेकॉर्डिग करून तेथील एका कर्मचाऱ्यांना या बद्दल विचारणा केली असता असेल त्या परिस्थितीला स्वीकार करण्याचे दर्शविले यावर एक अध्याय लिहिण्या पेक्ष्या पुढील वरोर्यातील प्रसाधन गृह व वेगवेगळ्या वार्डातील नाल्यानंची असलेली परिस्थिती पाहण्याचे ठरविले त्यात कॉल्लरी वार्ड, नवी वस्ती मधील सार्वजनिक प्रसाधन गृहाची परिस्थिती आपल्याला न सांगता आपणच लक्षात घेतलेली बरी त्या नंतर या वार्डातील काही नाल्या बुजलेल्या अवस्थेत होत्या येथील लोकांच्या मते ह्या नाल्या एक दोन महिने साफ़च होत नाही साफ झाल्या तर काढलेली घाण लवकर उचलत नाही असे स्पष्ट आरोप नगर परिषदेवर होत होते या नंतर मालवीय वार्डात जेमतेम हीच परिस्थिती पाहायला मिळाली येथील लोकांनी तर येथील नगर सेवकांचे नाल्या कडे लक्ष नसल्याचे सांगितले या नंतर सरदार पटेल वार्ड ( फैल ) या वार्डात सुद्धा जवळपास अशीच परिस्थिती दिसली मात्र या वार्डातील नगर सेवक दिनेश यादव हे आम्हाला भेटून त्यांनीच बुजलेल्या नाल्या स्वतः दाखवून दिल्या व सांगितले की आमच्या वार्डातील नाल्या पूर्णपणे नियमित साफ करत नसल्याचे आरोप नगर परिषदेवर केले त्याच बरोबर वरोर्यात प्रत्येक वार्डात डुकरांच्या हैदोस इतका वाढला की रोडवरील एखाद्या गाडीला अटकलेल्या थैल्यात किव्वा गाडीच्या डिक्कीतून फळ,भाजीपाला असेल तर हे डुकरं झुंडाणी जावून चट करून जातात या मुळे नगर परिषदेने या समस्ये कडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे वरोरातील काही रोड वगळता बाकी परिस्थिती नगर परिषदेला स्वच्छते बद्दल मीळालेल्या पुरस्कारावर विचार करण्या सारखी असून येथील अनेक समस्यांवर मंथन करून पाऊल उचलण्याची मागणी वरोर्यातील जनता करीत आहे.