आर्वी तालुक्यातील निम्म वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटर मुळे या प्रकल्पासाठी आधी अधिग्रहित न केलेल्या शेतजमीत पाणी शिरले आहे. जमीनी धरनामध्ये संपादित न केल्याने उत्पन्न घेण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी शेती वाहीपेरी करून महनीतीने पिके उभी केली होती. परंतु या वर्षी निम्म वर्धा धरनात पुर्ण शमतेने जलसाठा केल्याने धरनाचे पाणी झिरो लेवल पार करून मागे सरकून अधिग्रहित न केलेल्या जमिन क्षेत्रामध्ये शिरल्याने शेतकऱ्यांची उभी पिके व जमिन बाधीत झाली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.
तसेच आर्वी तालुक्यातील राजापुर गावात पाणी शिरले आहे. लोकांच्या अगदी घरापर्यंत पाणी आल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा व रात्रीच्या वेळेस जलचर प्राण्यांचा मुक्त संचारामुळे गावातील लोकांची, जनावरांची प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच देऊरवाडा गावातील वर्धा नदीकाठी राहत असलेल्या क्षेत्रात पाण्याच्या ओलीमुळे लोकांच्या घरामध्ये ओल निर्माण होऊन घरांची पडझड होत आहे. त्यामुळे राजापुर गावाचे पुनर्वसन व देऊरवाडा गावातील बाधीत क्षेत्रातील घरांचे पुनर्वसन करने गरजेचे आहे.
या करीता आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विभाग यांना मागे सरकलेल्या पाण्यामुळे बाधित झालेल्या शेतजमीन, राजापूर गावाचे पुनर्वसन तसेच देऊरवाडा गावातील बाधीत क्षेत्रातील घरांचे पुनर्वसन नवीन पुनर्वसन कायद्याने तातडीने करण्याची आग्रही मागणी केली आहे. तसेच शेतातील नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळण्यासाठी कृषी विभागाकडे केली आहे.