Breaking News

*प्रा.अनील पोडे यांचा आदर्श वाढदिवस.*

*वृद्धांना दिला काठीचा आधार*

कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:-
समाजाचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून “सृष्टी बहुउद्देशीय संस्था गडचांदूर” चे अध्यक्ष प्रा.अनील पोडे यांनी स्वतःचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.त्यासाठी त्यांनी वरोडा,नवेगाव व शांतीनगर येथील ५० वयोवृद्ध महिला व पुरुषांना वृद्धवस्थेत काठीचा आधार म्हणून काठ्या वितरीत केल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे उपस्थित होते.तर माजी सरपंच सुनील वांढरे,उपसरपंच नंदू तेलंग,प्राचार्या पोर्णिमा पोडे,अक्षय कायडिंगे,दिनेश घागरगुंडे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रत्येक युवकांनी म्हातारपणात आपल्या आई-वडिलांची सेवा करावी व त्यांचा इतिहास जाऊन बघावा,आज आपल्याकडे शेतात अत्याधुनिक तंत्रांचा वापर करून आपण कास्तकारी करतो.मात्र त्या काळात ते खांद्यावर नांगर घेऊन शेतापर्यंत जात होते.आपल्यासाठी ते दिवस-रात्र राबराब राबत होते.मात्र आता त्यांच्यावर वृद्धत्व आले असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता आपली एक संपत्ती म्हणून त्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन सभापती उरकुडे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. प्रा.अनील पोडे यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला व उतरत्या वयात वृद्धांच्या मनात आनंदाचा क्षण आणला.सदर कार्यक्रमाचे संचालन कोमल काळे,आभार रिता हनुमंते यांनी मानले.यशस्वितेकरिता एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल वरोडा येथील सर्व शिक्षक व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

About Vishwbharat

Check Also

महोगनी पेड लगाओ और 12 साल बाद मुनाफा ही मुनाफा कमाओ

महोगनी पेड लगाओ और 12 साल बाद मुनाफा ही मुनाफा कमाओ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

किसानों के अत्याधिक मुनाफा दायक है मशरूम की खेती

किसानों के अत्याधिक मुनाफा दायक है मशरूम की खेती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कानपुर। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *