*खड्डेयुक्त महामार्ग….!*

*ध्येयवेड्या तरुणांनी बुजवले महामार्गावरील”अपघातग्रस्त खड्डे”*

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:
राजूरा-गोविंदपूर महामार्गावरील गडचांदूर शहरा लगत काही ठिकाणी पडलेले अक्षरशः जीवघेणे खड्डे येथील काही ध्येयवेड्या युवकांनी एकत्र येऊन बुजवले.वास्तविक पाहता सध्या सदर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नेहमी लहानमोठे अपघात घडत आहे.युवकांनी बुजवलेले खड्डे काही दिवसापासून नागरिकांना जीवघेणे ठरत होते.ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागायची,कित्येक जण खड्ड्यात पडायचे,काहींनी तर जीव सुद्धा गमावला आहे.
दिवसरात्र याठिकाणी लहानमोठ्या वाहनांची रेलचेल असते मोठया प्रमाणात रहदारी असते.अत्यंत वरदळीचा आणी दोन राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे.यामुळे प्रवाश्यांसह शेतकऱ्यांना जीवमुठीत घेऊन ये-जा करावे लागत आहे. “रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते” हे कळायला मार्गच उरला नाही.लोकांचे जीव जात असताना बांधकाम विभाग मात्र कुंभकार्णी झोपेत असल्याचे आरोप होत आहे.मयूर एकरे,तुकाराम चिकटे,अनिकेत दैवलकर,राजू झाडे,शेख बाबर,झाकीर शेख,उद्देश भोंगळे,अतूल गोरे या तरूणांनी एकत्रितपणे श्रमदानातून सदर जीवघेणे खड्डे बुजवले असून आतातरी संबंधित विभाग याकडे लक्ष देऊन महामार्गाची दुरूस्ती करणार का ! याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

फोो

About Vishwbharat

Check Also

छुई-कान्हीवाड़ा परिसर में रेस्क्यू कर बाघ को पकड़ा

छुई-कान्हीवाड़ा परिसर में रेस्क्यू कर बाघ को पकड़ा   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

उपचारादरम्यान वाघाला आला “हार्टअटॅक”!

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, देवलापार वनपरिक्षेत्रातून उपचारासाठी आणलेल्या वाघिणीच्या बछड्याचा उपचारादरम्यान ‘हार्टअटॅक’ने मृत्यू झाला. मरणासन्न अवस्थेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *