*परिक्षेत्र बनले अवैध धंद्यांचे माहेरघर/दारूचे परवानेच वाटल्याचे चित्र !*
गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
औद्योगिक नगरीच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर परिक्षेत्र सध्या अवैध धंद्यांचे माहेरघर बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे.चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित झाल्यानंतर गडचांदूर पोलिस स्टेशन येथे बरेच ठाणेदार आले आणि गेले.त्यावेळी सुद्धा दारूविक्री व ईतर अवैध धंदे चालायचे पण कमीप्रमाणात.मात्र आताच्या ठाणेदारांनी तर आजपर्यंतचे सर्व “रेकॉर्ड” तोडले आहे.अवैध धंद्यांमुळे शहराची वाट लागत असताना स्वतःला जनतेचे सेवक,हितचिंतक म्हणून मिरवणारे तथाकथित नेते,स्वघोषीत समाजसेवक आता गप्प का ? याविषयी आश्चर्य व्यक्त होत असून नागरिकांसह विशेषतः महिला वर्गात संतापाची लाट पसरली आहे.
शहरात दारुविक्रीला मोठ्याप्रमाणात उधाण आल्याचे चित्र असून काही ठिकाणी अक्षरशः बार प्रमाणेच आसन व्यवस्था,थंड पाण्याची व्यवस्था,चकना मिळत असल्याची माहिती आहे.एकेकाळी याठिकाणी असलेले तत्कालीन ठाणेदार महेश कोंडावर यांनी आपल्या अल्पशा कार्यकाळात “नो सट्टा,नो दारु” ही मोहीम यशस्वीपणे राबवून अवैध धंद्यांवर मोठ्याप्रमाणात अंकुश लावला होता.मात्र सध्याची परिस्थिती पाहिल्यास “यस सट्टा,यस दारू” असे चित्र निर्माण झाले आहे.एकुणच दारूविक्री व ईतर अवैध धंद्यांमूळे गडचांदूर परिक्षेत्र अवैध धंद्यांचे माहेरघर बनल्याचे चित्र असून याठिकाणी नव्याने लाभलेले कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी नायक यांनीच आता याकडे जातीने लक्ष देऊन ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाल्याचे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.मात्र काहीका असेना शहरात सुरू असलेल्या दारूविक्री संदर्भात आताच्या ठाणेदारांनी आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढल्याची उपहासात्मक चर्चा शहरात ठिकठिकाणी सुरू आहे हे मात्र विशेष.फो
Check Also
बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई
बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …
नाबालिक से दुष्कर्म : आरोपी को आजीवन जेल की सजा
नाबालिक से दुष्कर्म : आरोपी को आजीवन जेल की सजा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …