Breaking News

आर्वीत वीजबिलांची होळी करून सरकारचा निषेध आमदार दादाराव केचे यांनी नोंदवला

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील पत्राडीत महावितरणच्या ग्राहकांच्या वतीने आमदार दादाराव केचे यांनी विज बिलाची होळी करत शासनाचा केलेल्या घोषणावर तारतम्य नसल्याने दिलेले शब्द पाळू न शकल्याने उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या सरकारने जनविरोधी भुमिका घेत जनतेचा विश्वासघात करत विश्वासघातकी सरकारचा आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्युत बिलांची होळी करत निषेध नोंदवला.

कोरोना संकटात जनतेची व्यवसाय, नौकरी हिरावली गेली. आर्थिक तोट्यात असलेली शहर आणि ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. अतिवृष्टीने शेतक-यांना झालेल्या नुकसान भरपाईची मांडलेल्या भुमिकेवर आर्वी विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे. हे सरकार फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि शिवसेनेचे आमदार असतील तिथेच भरसाठ मदत केली. धोरानात्मक दृष्टीकोनातून विदर्भ विरोधी धोरण राबवित महाराष्ट्रात सर्वात जास्त विज उत्पादन होत असतांना विदर्भा संदर्भात घेतलेल्या बेगडी भुमिकेचा निषेध करतो. आणि आर्वी विधानसभा क्षेत्रातील सर्व विद्युत ग्राहकांना अव्वा च्या सव्वा बिल आकारण्यात आलेल्याचा विरोध करीत, आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील नागरिकांनी विज बिल माफ होईस्तोवर कोणीही बिल भरू नये असे आवाहन यावेळी आमदार दादाराव केचे यांनी केले.

आर्वी येथील लक्षणीय आंदोलनाची सुरवात आर्वी नगरपरिषद ईमारती पासुन होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत महाराजांनी प्रजेवर जेव्हा जेव्हा अडचन आली तेव्हा जनतेच्या मदतीला धावून आल्याचा दाखला देत महाराष्ट्रचे मुख्यमंत्र्यांना खुर्ची सांभाळण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या चरणी बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा टांगणी लाऊन फक्त जनतेला लुटण्यासाठी चालवलेल्या कारस्थानाला आर्वी विधानसभा क्षेत्रात कधीही यशस्वी होऊ देणार नाही असे आमदार दादाराव केचे यांनी आवर्जून सांगितले.

या प्रसंगी प्रशांत वानखेडे अध्यक्ष भाजप आर्वी तालुका, विनय डोळे अध्यक्ष भाजप आर्वी शहर, जितेंद्र ठाकरे अध्यक्ष भाजयुमो आर्वी तालुका, मयुर पोकळे अध्यक्ष भाजयुमो आर्वी शहर, शुभांगी पुरोहित युवती प्रमुख वर्धा जिल्हा, प्रविण पवार उपाध्यक्ष भाजप, राजाभाऊ गिरधर, नंदूभाऊ थोरात यांच्यासह नगरपरिषदचे पदाधिकारी, सदस्य तसेच जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरीकांची लक्षणीय उपस्थिती होती.

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *