Breaking News

नागपूर पदवीधर मतदारसंघचे कर्तुत्ववान, तडफदार उमेदवार संदिप जोशींचा विजय निश्चित – आमदार दादाराव केचे

Advertisements

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, खो. री. प. यांच्या प्रचारार्थ आर्वी येथील आयनॉक्स सेलिब्रेशन हॉल मध्ये आर्वी शहर व ग्रामीण भागातील पदवीधर मतदारांचा व भाजपा पदाधिकारी तथ कार्यकर्त्यांचा मेळावा आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली तथा नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदिप जोशी, रामदास तडस खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र, शिरीष गोडे जिल्हाध्यक्ष भाजपा वर्धा जिल्हा, राजेश बकाने
सचिव भाजपा महाराष्ट्र प्रदेश, सुधीर दिवे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश किसान आघाडी, सौ. सरीता गाखरे अध्यक्षा जि. प. वर्धा, संदीप काळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी, हनुमंत चरडे पंचायत समिती सभापती आर्वी, अनिल जोशी संचालक वर्धा नागरी बँक आर्वी, प्रशांत सव्वालाखे नगराध्यक्ष आर्वी नगरपरिषद, वरून पाठक अध्यक्ष भाजयुमो वर्धा जिल्हा, अविनाश देव महामंत्री भाजपा वर्धा जिल्हा, सुनिल गफाट उपाध्यक्ष भाजप वर्धा जिल्हा, कमल कुलधरीया उपाध्यक्ष भाजप वर्धा जिल्हा, विजय बाजपेयी आर्वी विधानसभा प्रमुख भाजपा, विनय डोळे अध्यक्ष भाजप आर्वी शहर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

Advertisements

उपस्थितांना मार्गदर्शन करते वेळी सुधीर दिवे यांनी सांगितले की, संदिप जोशी यांनी राजकीय जीवनाची सुरुवात वार्डाचे अध्यक्ष म्हणून केली असुन भाजपाच्या महामंत्री पदावर तीन वेळा आणि मागील चार पंचवार्षिक पासुन नागपुर महानगर पालिकेत नगरसेवक ते नागपूरचे महापौर पद त्यांनी भुषविले आहे. विशेष म्हणजे त्यांचे आई आणि वडील शिक्षक असल्याने त्यांना शिक्षकांच्या समस्यांची जाणीव आहे. त्याचे वडील दिवाकर जोशी १९८४ – ९२ मध्ये शिक्षक आमदार होते. नागपूरच्या विकासात २४ x ७ पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन यात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याच बरोबर दिनदयाल रूग्ण सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूरच्या सरकारी दवाखान्यात १० रूपयात दिनदयाल थाली रूग्णांना व रूग्णाच्या नातेवाईकांना उपलब्ध करून दिली आहे. अशा या हरहुन्नरी उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले.

Advertisements

वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले की, संदिप जोशींनी जनहिताच्या कामांसाठी संघर्षातून राजकारणाची सुरूवात केली. त्यांची महापौर पदी असतांना केलेली कामगिरी दमदार आहे. सार्वजनिक कार्यासोबत त्यांचे क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव अष्टपैलू व्यक्तीमत्व यामुळे नावलौकिकास आले आहे. आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी विधानसभेतील अनेक प्रश्न सोडविले आहेत आणि अजूनही सोडवत आहेच पण काही प्रश्न विधानपरिषदेच्या माध्यमातून सोडवावे लागणार आहे. त्यामुळे सर्वात मोठा आणि भाजपाचे वर्चस्व असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघात संदिप जोशींना पाठवून विधानसभेची उर्वरित प्रश्न नक्कीच मार्गी लागेल.अध्यक्षीय भाषणात आमदार दादाराव केचे यांनी सांगितले की, संदिप जोशी तडफदार उमेदवार असुन नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत काम केलेले अनुभवी उमेदवार पदवीधर मतदारसंघाला लाभले आहे. हा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस ते आजपर्यंत भाजपाचा बालेकिल्ला राहीला आहे आणि तो यावेळीही अबाधित राहील. महापौर म्हणून कार्यरत असतांना संदिप जोशीचे काम नागपूरातील घराघरात पोहोचले आहे. अष्टपैलू, कर्तुत्ववान नेतृत्व असुन विविध विभागात केल्याने त्यांना समस्या सोडविण्याचा दांडगा अनुभव आहे. अनेक उमेदवार यावेळी रिंगणात आहेत पण ते जनतेच्या परीचित नाही. सर्वांगीण विकास साध्य करण्यास कर्तुत्ववान अनुभवी उमेदवाराची गरज असते. विधानसभेत बेरोजगारीचा, प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असतांना त्यांना काम मिळणे क्रमप्राप्त आहे. यासाठी एम. आय. डी. सी. ची आवश्यकता विधानसभेला आहे. संदीप काळे आणि त्यांच्या संस्था भाजपा सोबत असल्याने भाजपाचे बळ वाढले आहे. त्यामुळे संदिप जोशी यांचा विजयाची खात्री आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदिप जोशी यांनी त्यांच्या प्रचारार्थ केलेल्या भाषणात सांगितले की, सहा खासदार, ३३ आमदार, ६ विद्यापीठे, ५ मोठी शहरे, ६६ तालुके असा हा २,०६,००० मतदारांचा नागपूर पदवीधर मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार असतांना देवेंद्र फडणवीस यांनी न भुतो अशी कामे केली. निवडणूकीत १०५ आमदार निवडून आणल्यावरही मित्र पक्षाने दगाफटका करत पाठीत खंजीर खुपसला आणि अनैसर्गिक पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील काँग्रेस म्हणजे अफजल खानाचे जाळे, शरद पवार विश्वासघातकी आणि तिसरे दगाबाज असे तिन तिघाडा सरकार महाराष्ट्रात आहे. बिघाडी सरकारचे निर्णय म्हणजे जनते करीता अगऊचा व्यापच ठरत आहे. कोरोना काळात उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विज बिल माफ करण्याची घोषणा केली. या घोषणेने जनतेच्या हाताला काम नसल्याने जनता आनंदी झाली. परंतु तिघाडी सरकार मध्ये तारतम्य नसल्याने युटर्न मारत ३०० युनिटचे बिल माफ करण्याची घोषणा केली. परंतु बारामतीकरांनी ३०० युनिटची घोषणा १०० युनिटवर आणली. कोरोना काळात जनतेला आर्थिक टंचाई असतांना सरासरीने अव्वाच्या सव्वा रकमेची बिले पाठविली. आतातर सर्व हद पार करत उर्जा मंत्री म्हणतात की, संपूर्ण आलेले विज भरावेच लागणार बिले न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करू असे हे अजब सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार विदर्भावर अन्याय करणारे सरकार आहे. सरकार स्थापन होऊन एक वर्ष लोटले तरी ही एकही काम नव्याने विदर्भात सुरू नाहीत. जी कामे प्रगतीपथावर आहेत आणि होणार आहेत ती सर्व कामे भाजपाचे सरकार असतांनाच आहे. सुरू कामांचे पैसे देखील तिघाडी सरकारने वापस नेले. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेला ३५०० कोटी रूपये दिले होते त्यातूनही १४०० कोटी रूपये परत नेले. अर्धवट कामातून निधी नेल्याने कामे अर्धवट झाली आहे त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. विदर्भात पुर पिडीतांना मदत नाही, शेतकरी कोलमडून पडला आहे. कापूस, धान, सोयाबीन फळ बागा उद्वस्त झालेल्या आहे पण मदत मात्र नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदतीसाठी ४०० कोटी आणि संपूर्ण विदर्भाला १६ कोटी तिघाडी सरकारचा ऐवढा भयंकर राग विदर्भावर का? जनतेमध्ये सरकार विरोधात असंतोषाची लाट उसळली आहे. अश्यांचा मतपेटीतून त्यांना त्यांची जागा विदर्भातील जनता दाखवेल अशी आशा आहे. वर्धा जिल्ह्याकरीता बेरोजगारांसाठी योजना राबविणार, एम. आय. डी. सी. चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार दादाराव केचे यांना सर्वतोपरी मदत करून मंजुरी मिळविणार, नगरपालिका क्षेत्रातील विविध योजनांबाबत अधिकाऱ्यांना नागपूरच्या अनुभवातून योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार, बायोमाईनींगचा प्रस्ताव आर्वी शहरात कार्यान्वित करण्यासाठी मदत करणार आणि सदैव आपल्या सेवेत तत्परतेने रूजू राहणार असा शब्द यावेळी संदीप जोशी यांनी दिला.कार्यक्रमाचे संचालन प्रशांत वानखेडे अध्यक्ष भाजप आर्वी तालुका यांनी केली तर आभार प्रदर्शन विजय बाजपेयी आर्वी विधानसभा प्रमुख भाजपा यांनी केली. यावेळी पदवीधर मतदारांसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *