वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी वाढत्या सुशिक्षित बेरोजगारांबाबत चिंता व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना प्रतीमहा १००० रूपयांचा बेरोजगार भत्ता देण्याची आग्रही मागणी निवेदनातून केली आहे. कोरोना काळात अनेकांचे रोजगार हिरावल्यामुळे आधी नोकरीवर असलेल्यांवर कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे कठीन झाले आहे.
तसेच महाराष्ट्रातील अनेक सुशिक्षितांना नौकरी न मिळाल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण तर झाले आहेतच परंतु नौकरी नसल्याने कुटुंबाचा आणि स्वत:चा निर्वाह कसा करावा असा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे ठाकला आहे. आई वडील काटसर करीत पाल्याला चांगले शिक्षण दिले. पाल्याच्या शिक्षणासाठी वेळ प्रसंगी सोने नाणे, जमीन गहाण करून पाल्याला शिक्षणासाठी पैसे पुरविले. केलेल्या खर्चाची चिज करत महाराष्ट्रातील अनेकांनी पदवी, पदविका व इतर अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतू सरकारी, निमसरकारी इत्यादी नौकरीसाठी प्रयत्न करूनही सुशिक्षितांना यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनात कमालीचे नैराश्य आले आहे.
आमदार दादाराव केचे यांनी निवेदनातून सांगितले आहे की, महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांची संख्या आणि उपलब्ध असणाऱ्या नौकरीच्या संधीत कमालीची तफावत आहे. शिक्षण प्रणालीत अमुलाग्र बदल करून स्वयंम रोजगार निर्माण करून इतरांना रोजगार देण्याबाबत जोपर्यंत शिक्षण क्षेत्रात बदल घडणार नाही तो पर्यंत हि समस्या दिवसागणिक फारच बिकट होणार आहे. महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांचे मनोधैर्य खचू नये तथा विविध विभागांच्या निघालेल्या जागेचा अर्ज भरण्यासाठी लागणारा खर्च भागवता यावा यासाठी सुशिक्षित बेरोजगारनां प्रती महा १,००० रूपये बेरोजगार भत्ता दिल्यास नौकरी संबंधित अर्ज व इतर महत्त्वाच्या कामा करीता त्यांना वेळोवेळी इतरांसमोर पैश्यासाठी हात पसरावे लागणार नाही. त्यामुळे त्याचा स्वाभिमान वाढून नौकरी विषयक पुर्व तैयारी चांगल्या प्रकारे करून त्यांचे भवितव्य उज्ज्वल करू शकतात. याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करून १,००० रूपयांचा सुशिक्षित बेरोजगार भत्ता तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार दादाराव केचे यांनी केली आहे.