वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- वैशाली बुध्द विहार ट्रस्ट व धम्म मैत्री महिला मंडळ समता नगर सावंगी मेघे च्या वतीने जि.प.सदस्य उमेशभाऊ जिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वैशाली बुध्द विहारात बुध्द वंदना घेवून केक कापून शाल व गुच्छ देवून सत्कार करण्यात आला . त्यांच्यावाढदिवसानिमित्त बोधीवृक्ष पिंपळ व अशोकाचेझाडे लावण्यात आले . वृक्ष लागवडीसोबत वृक्षाचे संवर्धन व संगोपन झाले पाहिजे . असे विचार जि.प. सदस्य उमेशभाऊ जिंदे यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैशाली बुध्द विहार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुमेधभाऊ डुकरे तर प्रमुख अतिथी म्हणून चॅरिटेबल ट्रस्टचे सल्लागार राजपालजी मेश्राम , गौतम भितरे , अरुण भोवते , तसेच ग्राम पं . सदय सुरेश वैद्य हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन देवराव इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन उमाताई इंगोले यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य सुभाष सुटे , प्रशांत गजभिये , गौतम गणवीर , नितिन जाधव , आशिष थुल , राजेश घुसे , संदिप दलाल , हेमंत बुचुडे , विवेक सुटे , किशोर भगत , प्रशांत मेश्राम , हर्षल वैद्य , संदिप मेश्राम , विराज रामटेके , बंडू भितरे , मंगेश टेंभरे , धम्ममेत्री महिला मंडळाचे अध्यक्ष ज्योतीताई मेश्राम , तसेच सुनंदा खैरकार , उमाताई इंगोले , दिपीका घोडेस्वार , साधना कांबळे , महानंदा भोयर , सरोज टेंभरे , चंदा डुकरे , ज्योती भोंगाळे , आशा आव्हाड , उज्वला गायकवाड , शिला धाबर्डे , विद्या भगत , चंद्रकला सुटे , सुनंदा भोयर , मायाताई बुचुंडे , व शंभरकर ताई यांनी परिश्रम घेतले , वृक्षारोपण झाल्यावर अल्पोहार घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
Check Also
वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण
वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा
वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …