बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता
चंद्रपूर-
शहरातील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी मागील 22 फेब्रुवारीपासून सुरु केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता झाली. रामाळा तलावाच्या रक्षणार्थ इको- प्रोने केलेल्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे पत्र तहसिलदार निलेश गोंड यांच्या हस्ते देण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन धोतरे यांचे उपोषण 12 दिवसांनी सुटले.
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याकरीता पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यांकरण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास येत्या सात दिवसात सादर करण्याचे निर्देश दिलेत. रामाळा तलाव स्वच्छता व सुशोभीकरण करण्याकरीता दोन टप्यात कामे पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या निर्देशान्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या विषयाबाबत सर्व संबंधित यंत्रणेची आढावा सभा घेण्यात आली.
रामाळा तलाव खोलीकरण बाबतचा प्रस्ताव पाटबंधारे विभागामार्फत तयार करण्यात आला असून, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांना शुक्रवारी सादर करण्यात आला आहे. खोलीकरणाबाबत पुरातत्व विभागाची परवानगी आवश्यक असल्याने विहित नमुन्यात परवानगीसाठी प्रस्ताव तयार करुन भारतीय पुरातत्व विभागाला सादर करण्यात येत असल्याबाबत व यासंबंधाने वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून सदर प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यास विनंती करण्यात आली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
रामाळा तलावात होणार्या सांडपाण्याच्या विसर्जनावर उपाय म्हणून महानगरपालिका सांडपाणी प्रकल्प सयंत्र व रिटेनिंग वॉल बाबत प्रस्ताव तयार करून पर्यटन विभागास सादर करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले. रामाळा तलाव येथील मच्छी नालामधील पाणी झरपट नदी येथे वळविण्याकरीता नाला बांधकाम असे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. फ्रुट ओव्हर ब्रिज बांधकामाकरिता 449.11 लाखाच्या अंदाजपत्रकास शासनाकडून मान्यता मिळालेली होती आणि 107.21 लाख सार्वजनिक बांधकाम विभाग यांना प्राप्त झाले आहेत. या कामावरील खर्चात वाढ झालेली असल्यामुळे वाढीव अंदाजपत्रकास मान्यता घेण्यास्तव शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. रामाळा तलावाच्या कामाकरीता जिल्हा खनिज निधी मधून निधी उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री यांच्याशी चर्चा झाली असता जिल्हा खनिज विकास निधी व अन्य स्त्रोतामधून निधी उपलब्ध करुन देणेबाबत त्यांनी आश्वासन दिले. महानगरपालिका रामाळा तलावात येणारे सांडपाणी विषयक काम प्राधान्याने करणेबाबत महानगरपालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत.
Check Also
नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी
शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …
नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!
नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …