Breaking News

जिल्हा परिषदेसमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आंदोलन

Advertisements

 चंद्रपूर-
खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्यांची पूर्तता करावी, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. मागण्यंचे निवेदन माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी पूनम मस्के यांना देण्यात आले.
शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी 1982 ची कुटूंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा, तुकड्यांना प्रचलित धोरणानुसार अनुदान मंजूर करावे, 12 ते 24 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षणाची अट शिथिल करावी, नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना एकस्तर पदोन्नती व वाढीव घरभाडे भत्ता लागू करावा, 15 टक्के नक्षलग्रस्त भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार अदा करावा, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या आकृतीबंधाबाबतचा शासन निर्णय रद्द करून नियमित नियुक्तीचाा सुधारित आकृतीबंध तयार करावा, राज्य कर्मचार्‍यांप्रमाणे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना आश्‍वासित प्रगती योजना लागू करावी यासह 31 मागण्यांच्या पूर्ततेसाठी निदर्शने आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले. यावेळी कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, संघटक मनोज वासाडे, उपाध्यक्ष मंजुषा घाईत, नितीन जिवतोडे, प्रमोद कोंडलकर, दीपक धोपटे, राजू डाहूले, सुरेंद्र अडबाले, मोहनदास मेश्राम, भालचंद्र धांडे, देवेंद्र बल्की, पंकज बाराहाते, श्रीकांत पोडे, सचिन मोहितकर, जी. आर. ताजणे आदींची उपस्थिती होती. मागण्यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भाला अर्थसंकल्पात काय मिळाले?निव्वळ घोषणा?

महायुती सरकारच्या निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात विदर्भासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी १०० …

झाडावर उलटे टांगून माकडावर अत्याचार : कारवाईची मागणी

माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *