मुंबई/नवी दिल्ली-
देशात दररोज आढळून येणार्या नव्या बाधितांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वाटा असणार्या महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राचे उच्चस्तरीय पथक आज शनिवारी राज्यात दाखल झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाला हे पथक आवश्यक ते सहकार्य करणार आहे.
देशात आज कोरोनाचे सुमारे 18 हजार नवे बाधित आढळून आले. त्यातील दहा हजारांवर बाधित एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने केंद्र सरकारने हे पथक पाठविले आहे. असेच एक पथक पंजाबमध्येही पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्रात दाखल झालेल्या पथकाचे नेतृत्व केंद्रीय आपात् व्यवस्थापन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पी. रवींद्रन् यांच्याकडे आहे. या पथकातील सदस्य राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जिथे वाढत आहे, त्या भागांना भेट देणार आहे आणि कोरोना वाढण्यामागील कारणांचा शोध घेणार आहे. विशेष म्हणजे, देशात सध्या जितके सक्रिय बाधित आहेत, त्यातही 90 हजारांवर बाधित एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
देशातील कोरोनाचे संक्रमण कमी होत असताना, महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये अचानक कोरोनाबाधितांमध्ये प्रचंड वाढ झाली. यामुळे देशातील बाधितांचा आकडाही वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा नियंत्रणात आणण्यासाठी हे पथक राज्याच्या आरोग्य विभागाला काही सूचनाही करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Check Also
चिकित्सालय पंहुच मार्ग पर डांबरीकरण कार्य होने पर नागरिकों मे हर्ष
चिकित्सालय पंहुच मार्ग पर डांबरीकरण कार्य होने पर नागरिकों मे हर्ष टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …
आंखों में रोशनी बढाने के लिए रामबाण है आंवला
आंखों में रोशनी बढाने के लिए रामबाण है आंवला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …