प्रकल्प कार्यालय चिमूर द्वारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता
निवासी शाळेत दि. 10 मार्च पासून प्रवेश सुरू
चंद्रपूर, दि. 8 मार्च : नामांकित निवासी शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 करीता इयत्ता पहिली व दूसरीत प्रवेश घेउ इच्छीनाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दि 10 मार्च, 2021 पासून सुरू करण्यात येत असून प्रवेश अर्ज सर्व शासकिय आश्रमशाळा, वसतीगृह व प्रकल्प कार्यालय चिमूर येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
परिपुर्ण भरलेले प्रवेश अर्ज दि.15 एप्रिल 2021 पर्यंत संपूर्ण कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह पालकांनी स्वतः प्रकल्प कार्यालय चिमूर येथे जमा करावित. इयत्ता पहिली मध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी हा दि. 01 आक्टोबर, 2014 ते 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील जन्मलेला असावा, तर इयत्ता दूसरीच्या प्रवेशासाठी तो मागील सत्रामध्ये इयत्ता पहिली उर्तीण असावा. पालक शासकिय /निमशासकिय सेवेत नसावा, पालकाचे उत्पन्न रू. एक लक्ष पेक्षा कमी असावे. विधवा, निराधार व दारिद्र रेषेखालील पालकांच्या पाल्यानां प्राधान्य देण्यात येईल.
तरी संबंधीतांनी पालक-विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, पालकाचे जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, दारिद्र रेषेखाली असल्यास त्याचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पाल्याचे दोन फोटो, जन्माचा दाखला इ. संपूर्ण कागदपत्रांसह प्रकल्प कार्यालय चिमूर येथे अर्ज सादर करावा, असे चिमुर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनी कळविले आहे.