Breaking News

स्मशानभूमीतील जुन्या झाडांची अवैध रित्या  कत्तल,ठेकेदाराकडुन झाडांची परस्पर विक्री,  नगर पालीका प्रशासनाने केले दुर्लक्ष.

Advertisements
 वरोरा :
     वैयक्तिक  मालकीची घरातील किंवा शेतातील झाडे तोडण्यासाठी वनखात्याच्या विभागाकडुन परवानगी घ्यावी लागते. नगरपालिका हद्दीतील झाडे तोडण्यासाठी सुद्धा नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते, मात्र वरोरा नगरपालिका हद्दीतील वणी बायपास कडील स्मशानभूमीतील पुरातन काळापासून असलेली   जुनी झाडे नगरपालिकेच्या ठेकेदाराने  नगर परिषद प्रशासनाची वैधरित्या परवानगी न घेता परस्पर तोडून ती झाडे  परस्पर विकुन टाकल्याचा  धक्कादायक प्रकार विरोधी पक्षाचे गटनेते गजानन मेश्राम यांनी  उघडकीस आणला आहे.त्यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या कारवाई कडे नगरसेवकांचे लक्ष लागलेले असून ठेकेदारावर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.
येथील         वरोरा नगरपालिकेने वंणीबायपास  स्मशानभूमीच्या देखरीचे व  साफसफाई आणि झाडांची निगा राखण्याचा  ठेका वरोरा येथील सत्ताधारी पक्षाच्या नजदिक असणारे  विलास  दारापुरकर यांना दिला आहे. या स्मशानभूमीत सावली व विसाव्यासाठी लावलेली अनेक  दशकापुर्वीची जवळपास दहा  जुनी मोठी झाडे  तोडून, मेटॅडोरमधे टाकून कंत्राटदार विलास दारापुरकर यांनी नगर परिषद प्रशासनाला विश्वासात न घेता ती झाडे  परस्पर विकून टाकली.याशिवाय  या ठिकाणातील
 स्मशानभूमीतील असलेल्या मोठ्या  लोखंडी ग्रील गायब झालेल्या आहेत. त्या  चोरट्यांनी लंपास केल्या असा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी या झाडतोडीवरुन व झाडाच्या अवैध विक्रीवरून संशय निर्माण झाला आहे.   भरदिवसा   मोठ्या मोठ्या लाकडाची कटाई करून दिवसा व रात्रीच्या वेळात  सर्रास चोरी केल्या जात असताना  नगरपरिषद  चे मुख्याधिकारी तथा सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी आंधळे पणाचे सोंग का घेतले आहे. ते गप्प बसून का आहे असा आरोप नगरपरिषदेची विरोधी पक्षनेते गजानन मेश्राम यांनी केला आहे.नगरसेवक  मेश्राम यांनी याबाबत   नगरपरिषद ला  लेखी तक्रार करूनही मुख्याधिकारी यांनी  नगरपालिकेतर्फे  पोलिस ठाण्यात  अद्याप तक्रार दाखल केली नाही. नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून हे कंत्राटही भाजपच्या कार्यकर्त्यास दिले आहे.त्यामुळे हजारो रुपयाची वृक्षतोड व लाकुडचोरी याबाबत नगरपालिका काय कारवाई करणार? असा प्रश्न विचारला जात आहे.या गंभीर विषयावर वरोरा नगर परिषदने संबंधित कंत्राटदारावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे श्री. मेश्राम यांनी सांगीतले.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

रामनामाने नागपूर दुमदुमले, दीपोत्सव साजरा : अयोध्येत सकाळपासून भाविकांच्या रांगा

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्‍लाची काल सोमवार (२२ जानेवारी) रोजी प्राणप्रतिष्‍ठा करण्यात आली आहे. देशभरातील …

वनमंत्री मुनगंटीवार ने ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान के पास हवाई अड्डा बनाने का किया अनुरोध

वनमंत्री मुनगंटीवार ने ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान के पास हवाई अड्डा बनाने का किया अनुरोध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *