*घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात जागतिक महिला दिन साजरा*
*घुग्घुस येथील मा.आ.सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – सौ.किरण विवेक बोढे अध्यक्ष प्रयास सखी मंच, घुग्घुस*
*कर्तृत्ववान महिलांचा सत्कार*
घुग्घुस,[प्रभाकर कुम्मरी]- सोमवार 8 मार्चला दुपारी 2 वाजता घुग्घुस येथील मा.आ. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजपा युवमोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मंचावर घुग्घुस प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरण विवक बोढे, माजी जि.प. महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी, मोहुर्लीच्या सरपंच दीपा वडस्कर, माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली ढवस, निशा उरकुडे, पुष्पा रामटेके, चंद्रकला मन्ने, सारिका भोंगळे, नाजीम कुरेशी, सीमा पारखी उपस्थित होत्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ.किरण विवेक बोढे अध्यक्ष प्रयास सखी मंच, घुग्घुस ह्या म्हणाल्या महिलांच्या समाजातील योगदाना प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येते. स्त्री म्हणजे इच्छाशक्ती क्रियाशक्ती व ज्ञानशक्तीचे रूप आहे. महिलांना समाजात समान हक्क मिळावेत यासाठी झालेल्या संघर्षाला या दिवशी अभिवादन करण्यात येते.
घुग्घुस येथील मा.आ. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र मागील अनेक वर्षांपासून गोर गरिबांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. हे सेवा केंद्र दुर्बल,असहाय्य व निराधार महिलांच्या सक्षमी करणासाठी सदैव तत्पर असणारे केंद्र आहे.
घुग्घुस प्रयास अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या पुढाकारातून व एनआरएलएमच्या माध्यमातून 176 महिला बचत गटाना लाखो रुपयाचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. तसेच सेवा केंद्राच्या माध्यमातून जवळपास 600 महिलांना मोफत शिधापत्रिका काढून देण्यात आले आहे व जवळपास 700 महिलांचे मोफत मतदान ओळखपत्र काढून देण्यात आले तसेच 2100 महिलांना जनधन चे खाते काढून देण्यात आले आहे असे त्या म्हणाल्या.
यावेळी घुग्घुस येथील बचत गटाच्या माध्यमातून स्वयंम रोजगार करणाऱ्या कर्तृत्ववान महिला शारदा झाडे व उषा बोन्डे यांचा शाल व श्रीफळ देऊन सौ. किरण विवेक बोढे अध्यक्ष प्रयास सखी मंच घुग्गुस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संचालन सुनीता पाटील यांनी केले तर आभार सुनंदा लिहीतकर यांनी मानले. यावेळी घुग्घुस प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरण विवक बोढे, माजी जिप महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी मोहुर्लीच्या सरपंच दीपा वडस्कर माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली ढवस, पुष्पा रामटेके, सारिका भोंगळे, सीमा पारखी प्रतिमा बहादे, अनिता लालसरे,अर्चना लेंडे, वंदना मुळेवार, भारती गायकवाड,नाझीमा कुरेशी, मंगला बुरांडे,माला गोगला, उज्जवला आवळे, पुष्पा जानवे, वृंदा कोंगरे, सुनीता घिवे, दुर्गा जुमनाके, काजल पाटील, वंदना परिडा, आरिफ पठाण, अनुसया बेसरकर, निकिता सुद्दाला, छाया शेंडे शारदा कामतवार, छाया पचारे, अल्का पारशिवे, प्रेरणा नातर, ब्युला लिंगमपेल्ली, कविता येमूर्ले, तारा गेडाम, शारदा बुरांडे, सरस्वती खांडरे, सुमित्रा विश्वकर्मा, भागरता तुराणकार, बबिता नाईक, सिंधू डाफ, किरण बेसरकर, सुमन जुमनाके, पुष्पा पटेल, आशा शर्मा, लालमती देवी, उज्जवला कामतवार, सरस्वती आत्राम, पुष्पा जानवे, वर्षा नरवाडे, सपना वासेकर, अनिता वाघमारे, सुवर्णा वाडगुरे, साधना शिंदे, सपना मांढरे, राखी डांगे, शारदा झाडे, उषा जुलमे, आशा कोडापे, लता पातक, नंदा आत्राम, राखी शिंदे, रजनी यादव आरती यादव व मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी अजय लेंडे, शीतल कामतवार, सोनू बहादे, खुशबू मेश्राम, प्रिया नागभीडकर यांनी प्रयत्न केले.