Advertisements

कोरपना(ता.प्र.):-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वत्र लॉकडाऊन लावले होते.”घरी रहा,सुरक्षित रहा” असे आवाहन करण्यात आले.याला प्रतिसाद देत सर्व व्यवहार,व्यापार,कामधंदे बंद करून नागरिक घरीच बसून होते.इतर कार्यालयासह शाळा महाविद्यालय सुद्धा बंद होते.असे असताना आता शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या पालकांकडे शाळेची फी भरण्यासाठी तगादा लावायला सुरुवात केली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.फी माफीची मागणी होत असतानाच याच श्रेणीत कोरपना तालुक्यातील “अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आवारपूर” येथील शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी फी माफीसाठीची मागणी सदर सिमेंट कंपनीच्या युनिट हेडकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक पालक आर्थिक संकटात सापडले असताना शैक्षणिक शुल्क भरण्यास असमर्थ आहे.आपल्याकडून परिसरातील दत्तक गावांचा विकास व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठ्याप्रमाणात CSR निधी खर्च केला जातो.याच गावातील विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत असल्याने आपण सन २०२०,२१ या शैक्षणिक वर्षाचे शुल्क विद्यार्थ्यांकडून न घेता CSR निधीतून विद्यार्थींची फी भरावी अशी भावना पालकांनी निवेदनातून व्यक्त केली असून अल्ट्राटेक युनिट हेड यांच्याकडे मागणी वजा विनंती केली आहे.आता याविषयी काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Advertisements