Breaking News

अमृत पाणीपुरवठा योजनेची मा. महापौरांनी केली पाहणी

अमृत पाणीपुरवठा योजनेची मा. महापौरांनी केली पाहणी
चंद्रपूर १६ मार्च – अमृत योजनेद्वारे शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा केला जात आहे अश्या भागांची पाहणी  मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी आज केली. या विविध भागांचा सर्व्हे केला असता पाणीपुरवठा सुरळीत होत असलेला आढळुन आला मात्र काही ठिकाणी लिकेजेस आढळले असुन कंत्राटदाराला त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मा. महापौरांनी याप्रसंगी दिले.
अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम शहरात सुरु आहे. अनेक जागी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या पाईपलाईनद्वारे ज्या परीसरात पाणीपुरवठा केला जात आहे तिथे सुरळीत पाणीपुरवठा होतो आहे अथवा नाही, पाण्याचा दबाव कसा आहे, येणारे पाणी वरच्या मजल्यावर किती फोर्सने पोहचते याची माहिती महापौरांनी परिसरातल्या नागरीकांकडुन घेतली.
अनेक जागी सुरळीत पाणीपुरवठा केला जात असुन योग्य दबावाने पाईपलाईनद्वारे पुरवठा केला जात असल्याने घराच्या अगदी वरच्या मजल्यावरही चांगल्या फोर्सने पाणी येत असल्याचे आढळुन आले. मात्र काही जागी लिकेजेस आढळून आले असुन ती तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश मा. महापौरांनी दिले आहेत.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती श्री. रवि आसवानी,आयुक्त श्री. राजेश मोहिते, नगरसेवक श्री. सचिन आवारी, श्री. सुभाष कासनगोट्टूवार,शहर अभियंता श्री. महेश बारई,श्री. विजय बोरीकर, संजय जोगी उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

ऋषि मुनियों व संत महात्माओं की धरा है भारत भूमि?पूर्व शिक्षा मंत्री शर्मा के उदगार

ऋषि मुनियों व संत महात्माओं की धरा है भारत भूमि?पूर्व शिक्षा मंत्री शर्मा के उदगार …

दुनिया का सबसे बडा स्वयं सेवी संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

दुनिया का सबसे बडा स्वयं सेवी संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *